कागल : नवोदय नववी प्रवेश परीक्षा शनिवार ता.११ फेब्रुवारी रोजी

कागल : नवोदय नववी प्रवेश परीक्षा शनिवार ता.११ फेब्रुवारी रोजी

नवोदय नववी प्रवेश परीक्षा शनिवारी
कागल: जवाहर नवोदय विद्यालयात २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाकरिता इयता नववीच्या रिक्त असलेल्या जागेसाठी प्रवेश परीक्षा शनिवारी (ता. ११) या एकमेव परीक्षा केंद्रावर सकाळी ११.१५ ते दु.१.४५ या वेळेत होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईनद्वारे अर्ज भरले आहेत त्यांनी www.navodaya.gov.in आणि www.nvsadmissionclassnine.in संकेतस्थळावरून विद्यार्थ्यांच्या यशस्वी झालेल्या ऑनलाईन अर्जातील नोंदणी क्रमांकाद्वारे जन्मतारीख पासवर्ड टाकून प्रवेशपत्र ८ फेब्रुवारी २०२३ पूर्वी घ्यायची आहेत. परीक्षेदिवशी सकाळी साडेनऊ वाजता उपस्थित असणे अनिवार्य आहे. प्रवेशपत्र नसेल तर विद्यार्थ्याला परीक्षेस बसता येणार नाही. कोविड १९ च्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक आहे, अशी माहिती प्राचार्य रवी दामोदर यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com