कागल : सामाजिक संघर्ष परिषदेचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कागल : सामाजिक संघर्ष परिषदेचे आयोजन
कागल : सामाजिक संघर्ष परिषदेचे आयोजन

कागल : सामाजिक संघर्ष परिषदेचे आयोजन

sakal_logo
By

04757
कागलला सामाजिक संघर्ष परिषद
कागल : सामाजिक संघर्ष परिषदेमधून चळवळीला बळ मिळते, असे प्रतिपादन प्रा. डॉ. अच्युत माने यांनी केले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त गैबी चौकात सामाजिक संघर्ष परिषद झाली. अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. अच्युत माने होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. यादव गायकवाड उपस्थित होते.
यावेळी प्रा. शहाजी कांबळे, रूपाताई वायदंडे, चंद्रशेखर कोरे आदींनी मनोगत व्यक्त केले. वक्तृत्व स्पर्धेचे बक्षीस वितरणही झाले. बी. आर. कांबळे यांनी स्वागत व प्रास्ताविक बाबासाहेब कागलकर यांनी केले. पाहुण्यांची ओळख प्रा. डॉ. श्रीधर शिंदे यांनी करून दिली. आभार अण्णासो आवळे यांनी मानले. सूत्रसंचालन विजय काळे, वैभव प्रधान यांनी केले. परिषदेचे आयोजन सचिन मोहिते , सात्तापा हेगडे, अजित भोसले, जयवंत हळदीकर, तानाजी सोनाळकर, निशीकांत कांबळे, आनंदा सिध्दनेर्लीकर, उत्तम साकेकर, सर्जेराव जिरगे , नामदेव केनवडेकर, मंजुनाथ वराळे , दिलीप शेंडूरकर, विजय कापशीकर, प्रल्हाद कांबळे, दिनेश मळगेकर, गोरख कांबळे, सचिन चिखलीकर, साताप्पा आनुरकर, बाजीराव हाचनाळकर, विद्याधर शिंदे आदींनी केले.