कागल : शिवजयंती उत्साहात साजरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कागल : शिवजयंती उत्साहात  साजरी
कागल : शिवजयंती उत्साहात साजरी

कागल : शिवजयंती उत्साहात साजरी

sakal_logo
By

04793

जयंती उत्सव समितीतर्फे
कागलला विविध उपक्रम
कागल, ता. १९ : छत्रपती शिवाजी महाराज याची जयंती, श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती यांचे वतीने विविध उपक्रमांनी साजरी झाली. या जयंती सोहळ्यास शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा नवोदीता घाटगे, वीरेंद्रसिंह घाटगे व श्रेयादेवी घाटगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
येथील बसस्थानक चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुर्णाकृती पुतळ्यास समरजितसिंह घाटगे, वीरेंद्रसिंह घाटगे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर वीरेंद्रसिंह घाटगे व श्रेयादेवी घाटगे यांच्या हस्ते छत्रपतींच्या उत्सव मूर्तीस अभिषेक करण्यात आला.
श्रीराम मंदिर येथे महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यामध्ये लेझीम पथक व धनगरी ढोल वादन यांची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. शिवज्योतीचे स्वागत समरजितसिंह घाटगे यांनी केले. या वेळी शाहूचे संचालक यशवंत माने, सतीश पाटील, माजी उपनगराध्यक्ष रमेश माळी, आनंदा पसारे, नंदकुमार माळकर, प्रकाश पाटील, दीपक मगर, बाळू नाईक, विवेक कुलकर्णी, अरूण गुरव, राजेंद्र जाधव, बाबगोंडा पाटील, धैर्यशील इंगळे, नम्रता कुलकर्णी, शितल घाटगे, रेवती बरकाळे उपस्थित होते. दरम्यान, शाहू साखर कारखाना कार्यस्थळावर शिवजयंती उत्साहात पार पडली. संचालक यशवंत उर्फ बॉबी माने यांच्या हस्ते शिव पुतळ्याचे पूजन केले. या वेळी उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, संचालक सचिन मगदूम, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण उपस्थित होते.