कागल : भूविकास बॅकेच्या थकीत कर्जदार शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करा व कर्मचाऱ्यांचीही देणी द्या

कागल : भूविकास बॅकेच्या थकीत कर्जदार शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करा व कर्मचाऱ्यांचीही देणी द्या

04803

भूविकास बँकेची
थकीत देणी द्या

समरजितसिंह यांचे उपमुख्यमंत्र्यांना निवेदन

कागल , ता. २१ : शिंदे - फडणवीस सरकारकडून भूविकास बँकेच्या थकीत कर्जदार शेतकऱ्यांची कर्जमाफी व कर्मचाऱ्यांची थकीत देणी दिवाळीपूर्वी देण्याचा निर्णय झाला आहे. त्याची अंमलबजावणी झालेली नाही. ती त्वरित करावी, असे साकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी निवेदनाद्वारे घातले.
यावेळी खासदार धनंजय महाडिक, अमल महाडिक, भूविकास बँक कर्मचारी संघटनेचे राज्य कार्यध्यक्ष एम. पी. पाटील यांची उपस्थिती होती.
भूविकास बँका अवसायनात निघाल्याने बँकेचे कर्जदार शेतकरी व कर्मचारी अडचणीत आले होते. शिखर भूविकास बँक व २९ जिल्हा भूविकास बँकांच्या एकूण ६० मालमत्ता असून त्यापैकी १५ मालमत्ता शासनास हस्तांतरित करावयाच्या असून उर्वरित ४५ मालमत्तांची लिलाव पद्धतीने विक्री करण्याचा प्रस्ताव आहे. प्रस्तावास वित्त विभागाने मान्यता दिली आहे. त्यातून शेतकरी कर्जमाफी व कर्मचारी देणी भागविण्यत येणार आहेत. ६९ हजार हेक्टर शेतजमिनीवरील बोजा कमी होणार आहे. याचा लाभ ३४ हजार ७८८ थकीत कर्जदार शेतक-यांना होणार आहे. कर्मचाऱ्यांची थकीत देणी २७५ कोटी ४० लाख रु. मिळणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करून दिलासा द्यावा, असे निवेदनात नमूद आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com