
कागल : कागल नगरपरिषदेसमोर शेतकऱ्यांचे आज लाक्षणिक उपोषण
04810
कागल नगरपरिषदेसमोर शेतकऱ्यांचे उपोषण
कागल, ता. २१ : कागल नगरपरिषदेच्या प्रस्तावित विकास आराखड्याला विरोध दर्शविण्यासाठी कागलमधील शेतकरी व आराखडाबाधित नागरिकांतर्फे नगरपरिषदेसमोर लाक्षणिक उपोषण केले.
उपोषणस्थळी शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, जिल्हा बँकेचे संचालक प्रताप माने, माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर, नवल बोते, शिवसेना तालुकाध्यक्ष सुधीर पाटोळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सागर कोंडेकर यांनी भेट देऊन पाठिंबा दिला.
समरजितसिंह घाटगे म्हणाले, ‘विकास आराखड्यामध्ये शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी शिष्टमंडळाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी भेट घडवून आणू. पालिकेमधील त्यावेळीच्या कारभारी मंडळींनी व नेत्यांनी जवळच्या मंडळींचे गुंठेवारीचे धंदे चालवण्यासाठी शेतकऱ्यांवर अन्याय केला. पालिकेत आमची सत्ता आल्यानंतर पहिल्या सभेत आरक्षणाविरोधाचा ठराव पास करू. शेतकऱ्यांनी मुदतीत हरकती घ्याव्यात.’
आंदोलनात महेश घाटगे, सचिन मठूरे, महेश मगदूम, महेश चौगुले, रमेश घाटगे, दिलीप कोळी, अनिल जाधव, गजानन परीट, नरसगोंडा पाटील, कृष्णात गोरे, रमेश डोणे, महेंद्र जकाते, स्वप्नील हेगडे, रमेश मांडवकर, बबन शेळके आदिंसह आराखडाबाधित नागरिक सहभागी होते.