
कागल : कर्णबधिर विद्यार्थ्यांचा पहिला जिल्हास्तरीय विज्ञान मेळावा
04827
कर्णबधिर विद्यार्थ्यांचा पहिला विज्ञान मेळावा
कागल, ता. १ : येथील श्री शाहू छत्रपती अपंग कल्याण संस्थेमार्फत कर्णबधिर विद्यार्थ्यांचा पहिला जिल्हास्तरीय विज्ञान मेळावा राजे दिलीपसिंह घाटगे कर्णबधिर विद्यालयात झाला. पहिला जिल्हास्तरीय विज्ञान मेळावा आयोजित करण्याचा मान श्री शाहू छत्रपती अपंग कल्याण संस्थेस मिळाला.
राजमाता जिजाऊ समितीच्या कार्याध्यक्षा सौ. नवोदिता घाटगे यांनी उद्घाटन केले. डॉ. हेलन केलर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन केले.
सौ. नवोदिता घाटगे म्हणाल्या, ‘सामान्य मुलांच्या बरोबरीने दिव्यांग मुलांनी कलाकौशल्य दाखवले. असे विज्ञान मेळावे दरवर्षी आयोजित करा. यासाठी लागणारे सहकार्य करू.’
मेळाव्यात जिल्ह्यातील एकूण ७ शाळा सहभागी झाल्या. १ ली ते ४ थी व ५ वी ते ७ वी असे २ गट होते. विद्यार्थ्यांनी परीक्षकांना प्रकल्पाची माहिती सांकेतिक भाषा व तक्त्याच्या आधारे सांगितली. बक्षीस वितरण नवोदिता घाटगे, प्रकाश पाटील, कर्नल शिवाजी बाबर, प्रशांत मुजुमदार यांच्याहस्ते झाले. उमा नाडगौडा यांचे सौजन्य लाभले. मुख्याध्यापक संतोष गायकवाड यांनी स्वागत केले. चंद्रकांत शेटे, सदानंद पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. प्रशांत वाळवेकर यांनी सूत्रसंचालन केले. नियोजन सुहास कुरुकले यांनी केले. कार्याध्यक्ष प्रकाश पाटील यांनी आभार मानले.
कार्यक्रमास संध्या कुलकर्णी, छाया काळे, हेमंत कांबळे, जयश्री कोरे, अंजना शेलार उपस्थित होते.
चौकट
निकाल
पहिले ते चौथी गट - प्रथम क्रमांक - अतिफ मकानदार, ऋग्वेद आगलावे (वि. म. लोहिया कर्णबधिर विद्यालय, कोल्हापूर), द्वितीय - ज्ञानेश्वर चंदिवाले, ऋग्वेद देसाई (निवासी मूकबधिर विद्यालय, गडहिंग्लज). तृतीय - पलक पठाण, पियूष पाटील (कर्णबधिर विद्यालय, शिरोळ). उत्तेजनार्थ - चेतना कांबळे, आर्यन माळी (कर्णबधिर विद्यालय, पेठवडगाव).
पाचवी ते सातवी गट -
प्रथम क्रमांक - आदर्श कांबळे, ऋतुजा गेजगे (रोटरी डेफ स्कूल, तिळवणे). द्वितीय क्रमांक - किरण पाटील, अमेय पाटील (कर्णबधिर विद्यालय, कागल). तृतीय - आकाश कुंभार, संकल्प खराडे (साई मूकबधिर विद्यालय, गिजवणे) . उत्तेजनार्थ - वैष्णवी कांबळे, श्रावणी चौगुले (कर्णबधिर विद्यालय, पेठवडगाव) .