
कागल : सीमा तपासणी नाक्यावरील अधिकारी शेतकऱ्यांकडून धारेवर
04832
सीमा नाक्यावरील अधिकारी
शेतकऱ्यांकडून धारेवर
कागल, ता. २ : येथील आरटीओ सीमा तपासणी नाक्यावर लागणारे कर्मचारी म्हणून शेतकऱ्यांच्या मुलांना व स्थानिकांना घ्यावे, या मागणीसाठी शेतकऱ्यांकडून नाक्यावरील अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले.
येथील सीमा तपासणी नाका सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे नाक्यासाठी जमिनी गेलेले शेतकरी आक्रमक झाले आहेत. नाक्यावर लागणारे कर्मचारी म्हणून शेतकऱ्यांच्या मुलांना व स्थानिकांना घ्यावे, अशी त्यांची मागणी आहे. या मागणीसाठी शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले व नाक्यामध्ये शेतकऱ्यांच्या मुलांशिवाय एकही कर्मचारी घेऊ नये, असे बजावले. टेंडरही संबंधित शेतकऱ्यांना न देता इतरांना दिले जात आहे. स्थानिकांना व मुलांना नोकऱ्या दिल्याशिवाय नाका सुरू होऊ देणार नाही, असा पवित्रही शेतकऱ्यांनी घेतला आहे. या आंदोलनात संजय गोनुगडे, सुहास हिंगे, प्रशांत घाटगे, योगेश गाताडे, महेश घाटगे, योगेश तोडकर, धीरज घाटगे, रमेश तोडकर, दौलत घाटगे, अमोल पाटील आदींनी सहभाग घेतला. यावेळी नाक्याचे व्यवस्थापक निलेश भोसले, हेमंत खोत, निलेश आसबे उपस्थित होते .
ांकोट
शेतकऱ्यांच्या मागणीबाबत वरिष्ठ कार्यालयाला कळविले आहे. वरिष्ठ कार्यालयाकडून जो आदेश येईल त्याप्रमाणे अंमलबजावणी होईल.
- नीलेश भोसले, व्यवस्थापक, महाराष्ट्र सीमा तपासणी नाका