
कागल : शेतकरी घंटानाद आंदोलन
04858
कागलला शेतकऱ्यांचे
घंटानाद आंदोलन
कागल, ता. ७ : ''जमीन आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची'' घोषणेबरोबरच घंटानाद करत शेतकऱ्यांनी शहरात फिरून आंदोलन केले. यावेळी सर्वच देवालयांमध्ये साकडं घातले. प्रस्तावित विकास आराखाडा रद्द करावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी अनोखे आंदोलन केले.
प्रस्तावित विकास आराखाड्यामुळे अनेक शेतकरी अल्पभूधारक आणि भूमिहीन होत आहेत. याविरोधात बाधित शेतकऱ्यांनी पालिकेकडे लेखी तक्रारी केल्या.
आज गैबी चौकातून आंदोलनाला सुरवात केली. ग्रामदैवत श्री गहिनीनाथ गैबी पिराला आंदोलकांनी साकडं घातले. यावेळी ''जमीन आमच्या
हक्काची, नाही कोणाच्या बापाची'' अशा जोरदार घोषणा देत आंदोलकांनी घंटानाद सुरू केला. घंटानादाच्या निनादात त्यांनी गल्लीबोळात फेरी काढली. पालिकेने काही ठिकाणी पिकाऊ जमिनीवर आरक्षणे टाकली आहेत. बहुतांश ठिकाणी अल्पभूधारक शेतीवरही आरक्षणे टाकली आहेत. तसेच पूररेषेतही आरक्षणे टाकली आहेत. त्यामुळे काही शेतकरी अल्पभूधारक तर काही भूमीहीन होणार आहेत. त्यामुळे अन्यायी विकास आराखडा रद्द करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. आंदोलनात महेश घाटगे, अनिल जाधव, भरत नेर्ले, सतिश पाटील, अमर सणगर, स्वप्नील हेगडे, सुनील हिंगे, दिलीप कोळी, गजानन परीटसह शहरातील शेतकरी सहभागी झाले होते.
चौकट
मोर्चातील फलक
शेतकरी उपाशी लॅण्डमाफिया तुपाशी
शेतकरी राहिला तर जनता राहील
खरंच आमचा देश कृषीप्रधान आहे का?
रद्द करा रद्द करा विकास आराखडा रद्द करा
शेतीमालाला दर नाही शिल्लक शेती तुम्ही ठेवत नाही