कागल : आशा सेविका सौ. सरीता एकल यांचा आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते गौरव.

कागल : आशा सेविका सौ. सरीता एकल यांचा आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते गौरव.

04860
सरिता एकल यांचा गौरव
कागल : यमगे (ता. कागल) येथील आशासेविका सरिता एकल यांचा आमदार हसन मुश्रीफ यांच्याहस्ते गौरव झाला. यमगेजवळ रस्त्याकडेलाच प्रसूत झालेल्या मध्यप्रदेशातील ऊसतोडणी मजूर बाळंतिणीची आणि बाळाची त्यांनी सेवासुश्रुषा करून रुग्णवाहिका बोलावून सुखरूप मुरगूडच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवले होते. त्यांना आशासेविका सुनीता पाटील, सुनीता कांबळे, लक्ष्मी पाटील यांनी सहकार्य केले. आमदार श्री. मुश्रीफ म्हणाले, एकल यांनी मजूर महिलेप्रती जपलेली सेवाभावी वृत्ती वाखाणण्याजोगी आहे. सरिताताईंचा अभिमान वाटतो.’ यावेळी आरोग्य अधिकारी डाॅ. रूपाली लोकरे, आरोग्यसेविका एस. डी. कांबळे, एम आर. समाधान, आरोग्यसेवक भरत पाटील, शामराव पाटील, ग्रामपंचायत सदस्य विशाल पाटील, दत्ता पाटील, अंकुश वारके, किरण पाटील, राजू सावंत, रणजित पाटील उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com