कागल : जागतिक महिला दिनानिमित्त महिलासाठी विविध रंगतदार स्पर्धा - सौ नवोदिता घाटगे यांची माहिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कागल : जागतिक महिला दिनानिमित्त महिलासाठी विविध रंगतदार स्पर्धा - सौ नवोदिता घाटगे यांची माहिती
कागल : जागतिक महिला दिनानिमित्त महिलासाठी विविध रंगतदार स्पर्धा - सौ नवोदिता घाटगे यांची माहिती

कागल : जागतिक महिला दिनानिमित्त महिलासाठी विविध रंगतदार स्पर्धा - सौ नवोदिता घाटगे यांची माहिती

sakal_logo
By

कागलला महिला दिनानिमित्त
आज विविध रंगतदार स्पर्धा
कागल, ता. ७ : जागतिक महिला दिनानिमित्त ता. ८ व ९ मार्चला येथील राजमाता जिजाऊ महिला समितीतर्फे महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे, अशी माहिती कार्याध्यक्षा सौ. नवोदिता घाटगे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
५१ हजार रुपयांहून अधिक आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी स्पर्धेतून मिळेल. स्पर्धेसाठी प्रवेश विनामूल्य आहे. यामध्ये महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभाग घ्यावा. असे आवाहन राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा सौ. नवोदिता घाटगे यांनी केले आहे.
बुधवारी ८ मार्चला रांगोळी स्पर्धा सकाळी ९ ते ११ या वेळेत तर मेंदी स्पर्धा सकाळी साडेदहा ते बारा वेळेत होतील. स्पर्धा मंडलिक हॉल शाहू कॉलनी, श्रमिक हाऊसिंग सोसायटी, बिरदेव समाज मंदिर, शाहू वाचनालय, दूधगंगा डेअरी, आंबेडकरनगर समाजमंदिर, राधाकृष्ण मंदिर, राधाकृष्ण हॉल, वडुवाडी समाजमंदिर येथे होतील. गुरुवारी ९ मार्चला पनीर महोत्सवअंतर्गत पनीरच्या पाककृती स्पर्धा सायं ४ ते ५ तर पारंपरिक वेशभूषा व फनी गेम्स सायंकाळी ५ वाजता श्रीराम मंदिर, खर्डेकर चौक येथे होतील. विजेत्यांना रोख रक्कम, प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह तर सहभागी स्पर्धकांना प्रशस्तीपत्र देण्यात येईल.