कागल : प्रस्तावित विकास आराखड्यास स्थगिती व फेरतपासणीचे आदेश - खासदार प्रा.संजय मंडलिक प्रयत्न

कागल : प्रस्तावित विकास आराखड्यास स्थगिती व फेरतपासणीचे आदेश - खासदार प्रा.संजय मंडलिक प्रयत्न

04867

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करताना खासदार प्रा.संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजेंद्र पाटील - यड्रावकर.
...


प्रस्तावित विकास आराखड्याच्या
फेरतपासणीचे आदेश ः खासदार मंडलिक


कागल, ता. ८ : कागल नगरपरिषदेच्या प्रस्तावित विकास आराखड्यास आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्पुरती स्थगिती देऊन चौकशीचे व फेरतपासणीचे आदेश दिले आहेत. खासदार प्रा.संजय मंडलिक यांनी मुंबई येथे विधानभवन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन कागल नगरपरिषद प्रस्तावित प्रारूप विकास आराखड्यास स्थगिती देण्याची मागणी खासदार मंडलिक यांनी केली.याबाबतचे पत्रक त्यांनी प्रसिध्दीस दिले आहे.

खासदार मंडलिक यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे, ‘या प्रस्तावित प्रारूप आराखड्यात अल्पभूधारक, धरणग्रस्त व अन्य शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे. काही शेतकरी भूमिहीन होण्याची वेळ आली आहे. आरक्षणात मोठ्या प्रमाणात रस्ते टाकण्यात आले आहेत. आदी अनेक कारणांमुळे शेतकऱ्यांमध्ये उद्रेक होत आहे.’
ही परिस्थिती लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ स्थगिती आदेश दिले आहेत. त्यामुळे प्रारूप विकास आराखड्याचे काम आता थांबणार आहे, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे. यावेळी खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजेंद्र पाटील - यड्रावकर व अतुल जोशी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com