कागल : महिला दिनानिमित्त आयोजित विविध उपक्रमांना महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कागल : महिला दिनानिमित्त आयोजित विविध उपक्रमांना महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
कागल : महिला दिनानिमित्त आयोजित विविध उपक्रमांना महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कागल : महिला दिनानिमित्त आयोजित विविध उपक्रमांना महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

sakal_logo
By

04873
कागल राजमाता जिजाऊ महिला समिती
कागल : राजमाता जिजाऊ महिला समितीतर्फे विविध प्रशिक्षण, व्यवसायासाठी अर्थसहाय्य व विक्री व्यवस्था उपल्बध करून दिली जाते. त्याचा महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कार्याध्यक्षा नवोदिता घाटगे यांनी केले. येथे श्रीराम मंदिरामध्ये बक्षीस वाटपावेळी त्या बोलत होत्या. शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांची उपस्थिती होती. यावेळी नंदितादेवी घाटगे यांचा घाटगे घराण्याच्या इतिहासावर प्रकाशझोत टाकणारे पुस्तक लिहिल्याबद्दल व विजया निंबाळकर यांची डोंगरी विकास अंमलबजावणी समिती सदस्यपदी निवड झाल्याबद्दल सत्कार केला. विजेत्यांची अनुक्रमे नावे -पनीर महोत्सव स्पर्धा- पल्लवी धोत्रे, अनुपमा जोशी, दीक्षा रेळेकर, दिपिका कुलकर्णी, प्रियांका मर्दाने. पारंपरिक वेशभूषा - नेहा काळेबेरे, स्वप्ना पालणकर, गुणमाला पाटील; मेंदी- मुस्कान शेख, मानसी पाटील, पुनम कालेकर, नीलम कागलकर, श्वेताराणी कांबळे.रांगोळी- प्रियांका खामकर, बालीषा माधव, सृष्टी पाटील, सारिका मिसाळ, स्नेहल परब. यावेळी बिद्रीच्या संचालिका निताराणी सूर्यवंशी, सारिका चौगुले, आनंदी मोकाशी, लक्ष्मी सावंत, जयश्री कोरवी, सुधा कदम, नम्रता कुलकर्णी, अश्विनी भोसले, शितल घाटगे आदींसह महिला उपस्थित होत्या. स्वागत नंदा गाडेकर, प्रास्ताविक प्रतिभा गजबर, शीतल माने यांनी आभार मानले.