Mon, June 5, 2023

कागल : जुनी पेन्शन योजना थाळी आंदोलन
कागल : जुनी पेन्शन योजना थाळी आंदोलन
Published on : 20 March 2023, 5:38 am
04911
कागलला सातव्या दिवशी थाळी आंदोलन
कागल : जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी आक्रमक झालेल्या कर्मचाऱ्यांनी आज संपाच्या सातव्या दिवशी पंचायत समितीच्या आवारात थाळी नाद करण्यात आला. राज्य शासनाने जुन्या पेन्शनसंदर्भात गठीत केलेल्या समितीच्या नावाने निषेध म्हणून कर्मचाऱ्यांनी थाळीनाद केला. थाळीवर चमचा आपटून रोष व्यक्त केला. संपात विविध कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी व सभासद सहभागी झाले आहेत. शासकीय कार्यालयातील कर्मचारी संपात उतरल्यामुळे कार्यालयीन कामकाज ठप्प आहे. कार्यालयात फक्त प्रमुख अधिकारी आहेत; पण प्रत्यक्ष काम करणारे कर्मचारी नसल्याने कामे खोळंबली आहेत.