गुढीपाडवा ते रामनवमी कागलमध्ये विविध कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुढीपाडवा ते रामनवमी 
कागलमध्ये विविध कार्यक्रम
गुढीपाडवा ते रामनवमी कागलमध्ये विविध कार्यक्रम

गुढीपाडवा ते रामनवमी कागलमध्ये विविध कार्यक्रम

sakal_logo
By

रामनवमीपर्यंत कागलला धार्मिक कार्यक्रम
कागल : येथील श्री राममंदिरात गुढीपाडवा ते श्रीरामनवमी काळात परमार्थिक व सांस्कृतिक कार्यक्रम होतील, अशी माहिती रामनवमी उत्सव समितीने प्रसिद्धीस दिली. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र आणि प्रा. के. वी. बेलसरे यांच्या ग्रंथावर आधारित प्रवचन होईल. गुरुवारी (ता. २३) बालवयात गुरू व भगवंत दर्शनाची तळमळ, शुक्रवारी (ता.२४) ग्रहत्याग व भारतभ्रमण व गुरूकृपा, शनिवारी (ता. २५) श्री गुरू अनुग्रह गुरुसेवा, रविवारी (ता. २६) गोंदवलेत श्रींचे आगमन व कार्य, सोमवारी (ता. २७) भारतभर मंदिरांची स्थापना, मंगळवारी (ता. २८) श्रींनी निर्माण केलेले शिष्य व गोंदवलेत संजीवन समाधी विषयावर प्रवचन होईल. कार्यक्रम सायंकाळी पाच ते सात वेळेत श्रीराम मंदिरात होतील. बुधवारी (ता. २९) श्रीराम जप व प्रवचन मालिका समाप्ती होईल. गुरुवारी (ता. ३०) श्रीराम सेवा भजनी मंडळाचा कार्यक्रम होईल. सकाळी श्रीराम जन्मोत्सव व सुंठवडा वाटप. सायंकाळी श्रीराम भजन आधारित भरतनाट्यम् कार्यक्रम होईल.