कागल : निषेध आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कागल : निषेध आंदोलन
कागल : निषेध आंदोलन

कागल : निषेध आंदोलन

sakal_logo
By

कागलला राष्ट्रवादी काँग्रेसचे निषेध आंदोलन
कागल ता. २६ : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर केलेल्या कारवाईचा कागल शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे आज निषेध करण्यात आला. गांधी यांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस ठामपणे असल्याची ग्वाही कार्यकर्त्यांनी दिली. येथील बसस्थानक चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर कार्यकर्त्यांनी निषेध आंदोलन केले. यावेळी ‘लोकशाही बचाओ मोदी हटावो’च्या घोषणा दिल्या.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने म्हणाले, ‘निरव आणि ललित मोदी पळून गेलेत. त्यावर बोलल्यानंतर राहुल गांधी यांच्यावर कारवाई झाली. राष्ट्रवादी काँग्रेस राहुल गांधी यांच्या पाठीशी आहे.’ कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावरील कारवाईचा निषेध करत भाजपा आणि केंद्र शासनाविरोधात घोषणा दिल्या.यावेळी माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांनी मनोगत व्यक्त केले. नवीद मुश्रीफ, नवल बोते, इरफान मुजावर, संजय ठाणेकर, संजय चितारी, सुनील माळी यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.