कागल : ( सुधारित) श्रीराम नवमी सप्ताह परमार्थिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा

कागल : ( सुधारित) श्रीराम नवमी सप्ताह परमार्थिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा

04937

कागल श्रीराम मंदिरात
रामनवमीचे कार्यक्रम उत्साहात

कागल, ता. १० : येथील श्रीराम मंदिरात श्रीराम जन्मोत्सव भक्तिमय वातावरणात झाला. यानिमित्ताने प्रभू श्रीराम, सीतामाई, बंधू लक्ष्मण, रामभक्त हनुमान यांच्यासह मंदिर परिसरातील सर्वच मूर्तींची आकर्षक पूजा बांधली होती. शाहू गुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा नवोदिता घाटगे आणि युवराज आर्यवीर यांच्याहस्ते विधीवत पूजा झाली.
दुपारी बारा वाजता श्रीराम जन्मकाळ झाला. यावेळी भाविकांनी पुष्पवृष्टी केली. विधीवत पूजा व महाआरती प्रवीणसिंह घाटगे, शाहू साखरच्या अध्यक्षा सुहासिनीदेवी घाटगे, श्रीमंत नंदितादेवी घाटगे, समरजितसिंह घाटगे, सौ नवोदिता घाटगे, वीरेंद्रसिंह घाटगे, सौ. श्रेयादेवी घाटगे, आर्यवीर घाटगे यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी सुंठवड्याचे वाटप झाले. श्रीरामनवमीनिमित्त मंदिरात श्रीराम सेवा भजनी मंडळाचे भजन झाले. दिवसभर मंदिरात श्री रामरक्षा, महागणेश स्तोत्र पठण झाले. सायंकाळी श्रीराम भजन आधारित भरतनाट्यम् झाले. नगरसेविका विजया निंबाळकर, नम्रता कुलकर्णी, सुधा कदम, शीतल घाटगे, नंदा गाडेकर उपस्थित होत्या. दरम्यान श्रीराम मंदिरात चालू वर्षी चैत्र गुढी पाडवा ते श्रीराम नवमी काळात परामार्थिक व सांस्कृतिक कार्यक्रम झाले. यानिमित्त नामावतार, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र आणि वाड्मय लेखक प्रा. के. वि. बेलसरे यांच्या दिव्य ग्रंथावर आधारित प्रवचन झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com