कागल : हसन मुश्रीफ वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

कागल : हसन मुश्रीफ वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

04942
हसन मुश्रीफ यांचा वाढदिन विविध उपक्रमांनी
कागल, ता. ३० : माजी ग्रामविकासमंत्री आमदार हसन मुश्रीफ यांचा वाढदिवस येथे रक्तदान शिबिर, शाळांना संविधान, ग्रंथ भेट, रांगोळी स्पर्धा, मंदिर स्वच्छता, महाआरती व गहिनीनाथ गैबीपीरास गलेफ अर्पण आदी उपक्रमांनी झाला. आमदार हसन मुश्रीफ फाऊंडेशन व राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उपक्रमांचे आयोजन केले.
येथील राजर्षी शाहू सांस्कृतिक सभागृहातील रक्तदान शिबिरात ११२ जणांनी रक्तदान केले. प्रभाग ८ मध्ये एक किलो साखर आणि कापडी पिशवी ११०० कुटुंबांना वाटप केले. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर, श्रीनाथ सहकार समूहाचे संस्थापक चंद्रकांत गवळी, प्रवीण काळबर, सौरभ पाटील, नामदेवराव पाटील, सुनील माळी, शशिकांत नाईक, बाबूराव पुंडे, नवल बोतेंसह पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान नविद मुश्रीफ युवा अधिष्ठानमार्फत कोल्हापूर कॅन्सर सेंटरमध्ये कॅन्सरग्रस्त लहान मुलांबरोबर केक कापून वाढदिवस केला. यावेळी ७० मुला-मुलींना शालेय साहित्य व केक वाटप केले. कॅन्सरग्रस्त अब्दुल जमादार याने एलेमेंटरी चित्रकला स्पर्धेत राज्यात प्रथम क्रमांक व श्रीनाथ गुरव यांनी कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल सत्कार केला. यावेळी डॉ. जी. एम. विशाल, डॉ. स्वप्नील हुपरीकर, अमोल डोईफोडे, तुषार भास्कर, मोहसीन मुल्लाणी, समीना मुल्लाणी, शालमोन वाडकर, बाळकृष्णा पाटील, अमोल कांबळे, पेशंट व नातेवाईक उपस्थित होते.
माजी उपनगराध्यक्ष शशिकांत नाईक व शाहू कॉलनीतील कार्यकर्त्यांनी लक्ष्मी मंदिर परिसर स्वच्छता करून अभिषेक घातला. श्रीराम मंदिरात महाआरती झाली. शंकर संकपाळ व राजेंद्र पाटील तसेच शिक्षक सेलने भारतीय संविधान वाटप केले. वाय. डी. माने बालगृहात सरसेनापती संताजी घोरपडे फॅक्टरी कर्मचाऱ्यांच्यावतीने मुलांना स्नेहभोजन वाटप झाले. श्री बिरदेव मंदिरात सीसीटीव्ही व एलईडी बल्ब बसवले. यावेळी विनायक सनगर यांना २५ हजार मदत दिली. हणबर गल्ली व पिष्टे गल्ली तसेच श्रीनाथ समूह, डॅश ग्रुपतर्फे केक वाटप झाले. गणपतराव गाताडे मूकबधिर शाळेत स्नेहभोजन वाटप केले. ग्रामदैवत श्री लक्ष्मी देवालय परिसरात महिला स्वच्छतागृह बांधकाम प्रारंभ सुनील माळी, शशिकांत भालबर, नवीन शिबे यांच्यावतीने झाला. सणगर सोसायटीत वृक्षारोपण झाले. खर्डेकर चौकात गोकुळचे संचालक युवराज पाटील, कृष्णात पाटील यांच्यावतीने मोफत उसाचा रस वाटप केला.
नानीबाई चिखलीत दुग्धाअभिषेक
येथे श्रीराम मंदिरात सौ. व श्री. महेश मगदूम यांच्या हस्ते दुग्धाअभिषेक घातला. महादेव मंदिर, गैबीपीर देवस्थान व हालसिध्दनाथ मंदिरात महाआरती व अंगणवाडीत फळे वाटप झाले. याप्रसंगी बिद्रीचे संचालक प्रवीण भोसले, सरपंच अल्लाबक्ष सय्यद, सदाशिव तुकान, श्रीशैल नुल्ले, उत्तम पाटील, सुशांत पवार, सिकंदर आनुरे, प्रकाश वाडकर, महम्मद मुल्लाण्णी, वैभव गळतगे, शोभा चौगुले उपस्थित होते.
कौलवला महाआरती
शाहूनगर ः कौलवला मारुती मंदिरात राष्ट्रवादी काँग्रेस व धैर्यशीलदादा फाैंडेशनतर्फे महाआरती झाली. यावेळी धैर्यशील पाटील, सुशील पाटील, रणजीत पाटील, बाबूराव पाटील, सदाशिव पाटील, शिवाजी बरगे, महादेव पाटील, दिनकर पाटाेळे, आर. जी. चरापले, विनाेद जाधव, भगवान पाटील, सुरेश पाटील, रामभाऊ गुरव, महेश पाटील, उत्तम पाटील, दत्तात्रय पाटील, सागर पाटील, बंडाेपंत पाटील, निखिल चाैगले, मधुकर पाटील, सुहास यादव, बाबूराव पाटील, जयदीप पाटील, सुधीर पाटील उपस्थित हाेते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com