कागल : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती

कागल : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती

डॉ. आंबेडकरांना जयंतीदिनी अभिवादन
कागल परिसर; मिरवणूक, व्याख्यान, स्पर्धांसह विविध उपक्रम

कागल ता. १४ : कागल शहर आणि परिसरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती विविध उपक्रमांनी झाली. डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याचे पूजन करून त्यांना अभिवादन केले. सायंकाळी जयंतीनिमित्त सवाद्य मिरवणूक काढली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगरमधील समाज मंदिरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त बहुजन मुक्ती पार्टीचे सागर सुतार यांनी दीपप्रज्वलन केले. यावेळी पंचशील, नीता आदित्य यांचे व्याख्यान झाले. भीमराव कांबळे यांच्याहस्ते ध्वजवंदन झाले. डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याला आमदार हसन मुश्रीफ यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. जोतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन प्रकाश गाडेकर व राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने यांनी केले.
आमदार मुश्रीफ म्हणाले, ‘डॉ. आंबेडकरांनी अस्पृश्य समाजावरील अन्यायाविरोधात आयुष्यभर संघर्ष केला. त्यांनी परदेशात जाऊन कायद्याचे शिक्षण घेतले. मागास समाजातून बॅरिस्टर होणारे ते देशातील पहिले होत.’ यावेळी माजी नगराध्यक्ष अजित कांबळे, नवल बोते, प्रवीण काळबर, सौरभ पाटील, बहुजन मुक्ती पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष युवराज सुतार, नितीन दिंडे, नवाज मुश्रीफ, भगवान कांबळे, तुषार भास्कर, शशिकांत नाईक, गणेश कांबळे उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक नगरसेवक विवेक लोटे यांनी केले.
गैबी चौक तसेच शाहू उद्यानातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, आण्णाभाऊ साठे, महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्यांना आमदार हसन मुश्रीफ, माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर, जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने तसेच वीरेंद्रसिंह घाटगे, ‘शाहू साखर’चे संचालक यशवंत उर्फ बॉबी माने, सतीश पाटील, राजे बँकेचे उपाध्यक्ष नंदकुमार माळकर, रणजित पाटील, युवराज पसारे, संदीप नेर्ले, रमेश घस्ते, भीमराव कांबळेंसह नागरिकांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

शाहू कारखाना
शाहू साखर कारखाना कार्यस्थळावर कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांनी डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन केले. विविध शाळा, महाविद्यालये, संस्थांमध्ये डॉ. आंबेडकर जयंती झाली.

04995
कागल ः पहिल्या छायाचित्रात डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन करताना आमदार हसन मुश्रीफ. दुसऱ्या छायाचित्रात वीरेंद्रसिंह घाटगे, यशवंत उर्फ बॉबी माने, सतीश पाटील, नंदकुमार माळकर, रणजित पाटील, युवराज पसारे आदी.

बिद्री परिसरात अभिवादन
बिद्री : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ जयंतीनिमित्त बिद्री ता. कागल) दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्यात अध्यक्ष, माजी आमदार के. पी. पाटील यांच्याहस्ते डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन झाले. यावेळी संचालक सुनील सूर्यवंशी, अशोक कांबळे, कार्यकारी संचालक के. एस. चौगले, व्यवस्थापकीय संचालक आर. डी. देसाई, सचिव एस. जी. किल्लेदारसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
बोरवडेत सम्यक क्रांती विचार मंचच्यावतीने संबोधी बौद्ध विहार शाहूनगरात डॉ. आंबेडकरांना अभिवादन केले. यावेळी सरपंच जयश्री फराकटे, उपसरपंच विनोद वारके, माजी जि. प. सदस्य मनोज फराकटे, माजी सरपंच गणपतराव फराकटे, माजी पं.स. सदस्य रघुनाथ कुंभार, ग्रा. पं. सदस्य महादेव फराकटे, शिवाजी कांबळे, कृष्णात केसरकर, बीट अंमलदार पी. बी. गोजारे, अशोक कांबळे, ए.एल. कांबळे, अनिल बल्लाळ, पोलिसपाटील गौतम कांबळे, भिकाजी कांबळे, गणपती कांबळे , वसंत कांबळे, भास्कर कांबळे, मनोहर कांबळे, मानसिंग कांबळे, सदानंद कांबळे, बाबासो कांबळे उपस्थित होते.
वाळवे खुर्द (ता. कागल) येथे डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन ‘बिद्री’चे संचालक बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी समाजमंदिराचे उद्घाटन माजी जि. प. सदस्य भूषण पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास सरपंच संगीता बोडके, उपसरपंच हणमंत सुतार, सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
याशिवाय विद्यामंदिर बोरवडे,भारतमाता हायस्कूल, बोरवडे विद्यालय, केंद्रशाळा बिद्री, विद्यामंदिर सोनाळी, विद्यामंदिर उंदरवाडी, फराकटेवाडी, कुंभारवाडा, दत्तनगर आदी शाळांमध्ये प्रतिमापूजन झाले. यानिमित्त विविध स्पर्धा झाल्या.

01700
बिद्री : डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेला अभिवादन करताना के. पी. पाटील, संचालक सुनील सूर्यवंशी, अशोक कांबळे, के. एस. चौगले, आर. डी. देसाई आदी.

म्हाळुंगेत प्रतिमापूजन
राशिवडे बुद्रुक : म्हाळुंगे (ता. करवीर) येथे राजर्षी शाहू माध्यमिक विद्यालयात डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमापूजन झाले. प्रमुख पाहुणे श्री. सुदर्शनी यांनी डॉ. आंबेडकरांच्या कार्याची माहिती दिली. चंद्रकांत पाटील यांनी सूत्रसंचालन, मुख्याध्यापक अनिल चौगले यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. सोनिया पाटील, शर्वरी पाटील, वैष्णवी पाटील, सिद्धी मोरे, वेदिका पाटील, श्रेया चौगले, समृद्धी पाटील, पायल मोरबले यांनी डॉ. आंबेडकरांच्या कार्याचा आढावा घेतला.

पोर्ले तर्फ ठाणे परिसर
पोर्ले तर्फ ठाणे ः आसुर्ल-पोर्ले- दत्त दालमिया साखर कारखान्यात डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन जनरल मॅनेजर (एचआर) आनंद कामोजी यांच्याहस्ते झाले. यावेळी जनरल मॅनेजर (डिसलरी) आनंद कदम, जनरल मॅनेजर (केन) श्रीधर गोसावी, संग्रामसिंह पाटील, शिवप्रसाद देसाई, जालिंदर मिश्रा, नीलेश पाटील, मणिकंडन, दीपक सिंग, मोहसीन शेख, प्रकाश पवार, संदीप कांबळे आदींसह कर्मचाऱी.उपस्थित होते.
ग्रामपंचायत कार्यालयात डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच अनुराधा पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी परशराम खुडे, अंगद खुडे, उपसरपंच शहाजी खुडे, अरुण पाटील, संभाजी जमदाडे, नंदकुमार गुरव, तानाजी भोपळे, जीवन खवरे, विकास घाटगे, सचिन चोपडे आदींसह सदस्य उपस्थित होते. भव्य मिरवणूकही निघाली.

कोतोली परिसर
माजगाव ः पन्हाळा तालुका पश्चिम परिसरात डॉ. आंबेडकरनिमित्त विविध कार्यक्रम झाले. कोतोलीत आंबेडकर पुतळ्याशेजारी आकर्षक सजावट केली होती. कोतोलीत सरपंच वनिता पाटील, करंजफेणला सरपंच प्राजक्ता कांबळे, कल्याणी पाटील, तेलवेत सरपंच निरंजन पाटील, नणुंद्रेत सरपंच अश्विणी पाटील, उंड्रीमध्ये सरपंच सविता यादव, निवडेत सरपंच उज्वला सुतार यांनी डॉ. आंबेडकरांना अभिवादन केले.

राशिवडे बुद्रुकमध्ये जीवनकार्याचा आढावा
राशिवडे बुद्रुक : म्हाळुंगे (ता. करवीर) येथील श्रीमंत राजर्षी शाहू माध्यमिक विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त प्रतिमापूजन झाले. प्रमुख पाहुणे श्री. सुदर्शनी यांनी डॉ. आंबेडकर यांच्या कार्याची माहिती दिली. मुख्याध्यापक अनिल चौगले यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. चंद्रकांत पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
सोनिया पाटील, शर्वरी पाटील, वैष्णवी पाटील, सिद्धी मोरे,वेदिका पाटील, श्रेया चौगले, समृद्धी पाटील, पायल मोरबले या विद्यार्थिनींनी डॉ. आंबेडकरांच्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.


पुनाळ परिसरात विविध कार्यक्म
पुनाळ : तिरपण (ता.पन्हाळा) प्राथमिक शाळेत बालसभा झाली. रामदास झेंडे, चंद्रकांत पंडित यांनी मनोगत व्यक्त केले.विद्यार्थ्यांनीही मनोगत व्यक्त केले.यावेळी राजीव परीट,बबन पाटील,मुकेश शिंदे,शितल देसाई,चेतन शिंदे, उपस्थित होते.
ज्योतिर्लिंग हायस्कूल बोरगाव (ता. पन्हाळा) येथे मुख्याध्यापक डी. एस. लवटे यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. जान्हवी कांबळे, समीक्षा येरुडकर, संचिता मिसाळ, स्वरांजली कांबळे.यांनी मनोगते व्यक्त केले.मुख्याध्यापक डी. एस.लवटे अध्यक्षस्थानी होते. सहाय्यक शिक्षक डी. एस. चव्हाण ,डी एस. कुटे सर, माधव कांबळे, सागर कांबळे , भाऊसो पर्वते, सौ. रेखाताई सावंत उपस्थित होते.
श्रीपतराव चौगुले आर्ट्स अॅण्ड सायन्स कॉलेज, माळवाडी - कोतोली (ता.पन्हाळा) येथील प्रतिमेचे पूजन ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी प्र. प्राचार्य डॉ. श्रीमती व्ही. पी. पाटील होत्या.डॉ. आंबेडकरांच्या जीवनकार्याविषयी विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या लेखांचे प्रकाशन सचिव शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ग्रंथप्रदर्शन भरले होते. कार्यक्रमास डॉ.बी.एन. रावण, डॉ. एस. एस. कुरलीकर, सिनेट सदस्य डॉ. उषा पवार, उपस्थित होते. प्रास्ताविक व स्वागत ए.आर. महाजन यांनी केले .आभार शिल्पा बच्चे यांनी मानले.

------------
चौकट
03632
डॉ. आंबेडकरांच्या जीवनकार्यावरील
दुर्मिळ ६० हून अधिक ग्रंथांचे प्रदर्शन
वारणानगर : येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध उपक्रम झाले. वारणा विभाग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आमदार डॉ . विनय कोरे, प्रशासकीय अधिकारी डॉ. वासंती रासम यांनी शुभेच्छा दिल्या. महाविद्यालय प्रांगणात डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेला प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. ग्रंथालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावरील दुर्मिळ ६० हून अधिक ग्रंथांच्या प्रदर्शनाचे आयोजन केले होते. उद्घाटन डॉ. प्रकाश चिकुर्डेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी सहाय्यक ग्रंथपाल भालचंद्र शेटे, प्रा. एम. जी चिखलकर, डॉ. एस.एस. खोत, डॉ. यू. बी. चिकुर्डेकर, प्रा.यू. आर. जांभोरे, डॉ. पी.आर. साळोखे, प्रा. सत्यनारायण आर्डे, आर.एच. कोळी, प्रबंधक बाळासाहेब लाडगावकरसह प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विनायक कोरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातील अभ्यासक विद्यार्थी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com