
कागल : समरजितसिंह घाटगे कार्यक्रम
05034
शैक्षणिक यशामुळे
कागलचे नाव उजळले ः घाटगे
कागल, ता. २७ : लोककल्याणकारी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी कोल्हापूर संस्थांनमध्ये बहुजन समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. त्याचाच परिपाक बहुजन समाजातील मुले शैक्षणिक क्षेत्रात उज्ज्वल यश मिळवत आहेत. मुलांच्या यशामुळे कागलचे नाव उजळत आहे, असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केले.
विद्या दिवडे हिने बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात कृषी पदवीमध्ये प्रथक क्रमांकासाठीचे तसेच सर राॕबर्ट अलन सुवर्णपदक असे दुहेरी सुवर्णपदक पटकाविल्याबद्दल तिच्या नागरी सत्कारावेळी ते बोलत होते.
श्री टगे म्हणाले, ‘राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशनसतर्फे ई लर्निंग, शिष्यवृत्ती सराव परीक्षा, गुणवंत शिक्षकांना पुरस्कार असे शैक्षणिक उपक्रम सुरू आहेत. याचा फायदा कागलचा शैक्षणिक दर्जा उंचावत आहे.’
सत्काराला उत्तर देताना विद्या दिवडे म्हणाली, ‘कोल्हापूरबाहेर शाहूंचे कागल अशी कागलची ओळख आहे. त्यामुळे अभिमानाने ऊर भरून येतो. राजर्षी शाहूंच्या प्रेरणेमुळे खडतर परिस्थितीचा सामना करण्याचे बळ मिळाले.’ यावेळी माजी उपनगराध्यक्ष रमेश माळी, विजय बोंगाळे यांनीही मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर धोंडीराम दिवडे, संजय शहा, शाहूचे संचालक यशवंत माने, सतीश पाटील, राजे बँकेचे संचालक राजेंद्र जाधव, आप्पासो भोसले, प्रकाश पाटील, राजेंद्र कालेकर, सुनील पोवार उपस्थित होते. विजया निंबाळकर यांनी स्वागत, राजेंद्र मगर यांनी आभार मानले.