Thur, Sept 28, 2023

टू ४
टू ४
Published on : 28 April 2023, 3:15 am
‘जल ही जीवन है’वर मार्गदर्शन
कागल : कागल नगरपरिषद व भारतीय जलसंस्कृती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जल ही जीवन है’ विषयावर डॉ. अनिलराज जगदाळे यांनी मार्गदर्शन केले. डॉ. अनिलराज जगदाळे यांनी पाणी प्रदूषण, त्याचा वापर, उपलब्धता आणि त्यावर करण्यात येणाऱ्या उपाययोजनांविषयी स्लाईड शोद्वारे माहिती दिली. शाहू नगरवाचनालयात झालेल्या कार्यक्रमास मुख्याधिकारी श्रीराम पवार, विवेकानंद कॉलेजच्या पर्यावरण विभागाचे केंद्र संयोजक डॉ. सुनील भोसले, वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य जयश्री गंगाधरे उपस्थित होत्या. यावेळी मुख्याधिकारी पवार यांनी पाणी प्रश्नाच्या गांभीर्यतेवर विवेचन केले. डॉ. सुनील भोसले यांनी जलयुक्त शिवारबद्दल माहिती दिली. आभार आरोग्य निरीक्षक नितीन कांबळे यांनी मानले.