कागल : शरद पवार यांचे कागलमध्ये जोरदार स्वागत

कागल : शरद पवार यांचे कागलमध्ये जोरदार स्वागत

कागल : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे स्वागत करताना आमदार हसन मुश्रीफ व कार्यकर्ते
....

शरद पवार यांचे कागलमध्ये जोरदार स्वागत

फटाक्यांच्या आतषबाजी, घोषणांनी परिसर दणाणला

कागल , ता. ८ : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत निपाणी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार उत्तम पाटील यांच्या प्रचारासाठी आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे कागलमध्ये जोरदार स्वागत करण्यात आले. राजीनाम्याचा निर्णय मागे घेतल्यानंतर त्यांचे प्रथमच कागलमध्ये आगमन झाले. ''शरद पवारसाहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है'' या घोषणांनी कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. फटाक्यांच्या आतषबाजीने त्यांचे स्वागत करण्यात आले.
राष्ट्रवादीने कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या पक्षाचे उमेदवार उभे केले आहेत. निपाणी मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार उत्तम पाटील यांच्या प्रचारासाठी शरद पवार आले होते. कागल येथील शाहू क्रीडांगणावर हॅलीपॅडची व्यवस्था केली होती. श्री. पवार कागलमध्ये येणार असल्याची माहिती कार्यकर्त्यांना सकाळीच समजली होती. त्यामुळे सकाळपासूनच क्रिडांगणाच्या प्रवेशद्वारावर कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. हेलिकॉप्टरमधून श्री. पवार उतरले, त्यांना घेण्यासाठी सुरक्षा रक्षकांनी खास गाडी उभी केली होती. पण प्रवेशद्वाराजवळ कार्यकर्त्यांना उभे राहिल्याचे पाहून पवार यांनी गाडीमध्ये बसण्यास नकार देत कार्यकर्त्यांकडे चालत जाणे पसंत केले. ते प्रसन्न चेहऱ्या‍ने चालतच कार्यकर्त्यांकडे आले. आमदार हसन मुश्रीफ, आमदार राजेश पाटील यांनी पवार यांना बुके देऊन स्वागत केले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, माजी आमदार के .पी. पाटील, राजू आवळे, व्ही. बी. पाटील, आर. के. पोवार, युवराज पाटील, बाबासाहेब पाटील (आसुर्लेकर), धैर्यशील पाटील, राजू लाटकर, आदिल फरास , नवीद मुश्रीफ, साजीद मुश्रीफ यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पवार यांचे जोरदार स्वागत केले. पवार यांचे आगमन होताच सर्वांनी त्यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. कार्यकर्त्यांचे स्वागत स्वीकारून पवार यांनी काही वेळ विश्रांती घेतली. त्यानंतर ते प्रचार सभेसाठी निपाणीकडे रवाना झाले.
...

‘गोकुळ’ कडूनही स्वागत

कोल्हापूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे कोल्हापूर जिल्हा सहकारी दुध उत्पादक (गोकुळ) संघाच्यावतीने स्वागत करण्यात आले. ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्‍वास पाटील यांनी कागल येथे खासदार शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे, संचालक युवराज पाटील, शशिकांत पाटील-चुयेकर, किसन चौगले, प्रकाश पाटील, बयाजी शेळके उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com