कागल : भाजप कार्यकर्त्यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कागल : भाजप कार्यकर्त्यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
कागल : भाजप कार्यकर्त्यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

कागल : भाजप कार्यकर्त्यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

sakal_logo
By

05086
‘गाळमुक्त धरण..’ योजना
राबविण्यासाठी भाजपचे निवेदन

कागल, ता. ८ : गाव तलाव आणि धरणातील गाळ कमी होऊन पाणीसाठा वाढविण्यासाठी शासनाने ''गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार'' ही योजना राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्या अनुषंगाने कागलला पाणीपुरवठा करणाऱ्या ऐतिहासिक जयसिंगराव घाटगे तलावातील गाळ काढण्यासाठी व मुबलक पाणीसंचय होण्यासाठी शासनाची ही मोहीम राबवण्याची विनंती भाजपतर्फे मुख्याधिकारी श्रीराम पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
तलावात सध्या गाळ साठल्याने तलाव एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात कोरडा पडला आहे. यामुळे पाणीटंचाई भेडसावत आहे. ही समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी शासनाच्या गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना प्रभावीपणे राबवावी. योजनेअंतर्गत गाळ शेतापर्यंत पोहोच केला जाणार असून योजनेअंतर्गत एकरी पंधरा हजार रुपयेप्रमाणे हेक्टरी ३५ हजार रुपये अनुदान मिळणार आहे. विधवा, अपंग, आत्महत्याग्रस्तांचे कुटुंब, अल्प व अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना विशेष प्राधान्य आहे.
जलसंधारण विभागाच्या वतीने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम प्रभावीपणे राबविली जात आहे. पाणी समस्या कायमची सोडवण्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे शासनस्तरावर प्रयत्नशील आहेत. नगरपालिकेने तत्काळ मोहीम राबवावी अशी विनंती निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर माजी उपनगराध्यक्ष रमेश माळी, शाहू कारखान्याचे संचालक बॉबी माने, सतीश पाटील, शाहू दूध संघाचे संचालक युवराज पसारे, राजे बँकेचे संचालक राजेंद्र जाधव, बाळासाहेब हेगडे, धीरज घाटगे, महेश माने, रमण घाटगे आदींच्या सह्या आहेत.