जयसिंगराव तलावाचा पाणीसाठा साडेसहा फुटावर

जयसिंगराव तलावाचा पाणीसाठा साडेसहा फुटावर

05089
कागल : येथील संस्थानकालीन जयसिंगराव तलावाची पाणी पातळी साडेसहा फुटांवर आली आहे.


कागलच्या जयसिंगराव तलावाचा
पाणीसाठा साडेसहा फुटांवर
दूधगंगेतून उपसा; डाव्या कालव्यातून पाण्यासाठी पत्रव्यवहार
कागल, ता. १० : कागल शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या संस्थानकालीन जयसिंगराव तलावातील पाणीसाठा आता साडेसहा फूट राहिला आहे. शहराला दररोज ३२ लाख लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. यासाठी दूधगंगा नदीतून पाण्याचा उपसा केला जात आहे. डाव्या कालव्यातून तलावात पाणी सोडण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाशी पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पत्रव्यवहार केला आहे.
ऐतिहासिक जयसिंगराव तलावातून शहराला पूर्वी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात होता. शहराची लोकसंख्या वाढल्याने तलावातील पाणी कमी पडू लागले. त्यामुळे दूधगंगा नदीपात्रात जॅकेवल उभारून पाणी घेण्यात आले. जयसिंगराव तलाव आणि दूधगंगा नदीतून शहराला सध्या पाण्याचा पुरवठा केला जातो. त्यामुळे शहरवासीयांच्या दृष्टीने जयसिंगराव तलावाचे महत्त्व आजही कायम आहे. पालिकेनेही तलावाची साठवण क्षमता वाढविताना दूधगंगा नदीच्या डाव्या कालव्यातून तलावात पाणी सोडण्याची व्यवस्था केली आहे; मात्र कालव्याचे काम अद्याप सुरू असल्याने कालव्यात पाणी सोडण्यावर मर्यादा आल्या आहेत. सध्या जयसिंगराव तलावात साडेसहा फूट पाणी शिल्लक आहे. यातील साडेचार फूट पाणी मृतसाठा असल्याने काही मोजकेच दिवस तलावातून पाणी घेता येणार आहे. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून माणसी सरासरी १०० लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. त्यामुळे शहराला दररोज ३२ लाख लिटर पाण्याची गरज निर्माण झाली आहे. ही गरज भागविण्यासाठी दूधगंगा नदीतून पाण्याचा उपसा केला जात आहे. दूधगंगेच्या डाव्या कालव्यातील पाणी घेण्यासाठी पालिकेने जिल्हाधिकारी कार्यालयाशी पत्रव्यवहार केला आहे. तसेच दोन फुटांच्या दोन अतिरिक्त पाईप कालव्यातून तलावात टाकण्यास परवानगीही मागितली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com