कागल : कागल तालुका सरपंच परिषद पदाधिकारी निवडी घोषित

कागल : कागल तालुका सरपंच परिषद पदाधिकारी निवडी घोषित

05105
फोटो

शिर्डीः सरपंच परिषदेत सहभागी कागल तालुक्यातील पदाधिकारी.
...

कागल तालुका सरपंच परिषद
पदाधिकारी निवडी जाहीर

कागल , ता. १५ : शिर्डी (जि. अहमदनगर) येथे राज्यस्तरीय सरपंच पदाधिकारी कार्यशाळा नुकतीच झाली. या परिषदेत कागल तालुका सरपंच परिषद पदाधिकारी निवडी घोषित करुन सत्कार करण्यात आला. परिषदेच्या कागल तालुका अध्यक्षपदी सरपंच दिलीप चौगुले (भडगाव) व तालुका महिला अध्यक्षपदी सरपंच संपदा दीपक कुंभार (हळदी) यांना नियुक्तीचे पत्र आदर्श गाव योजनेचे अध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार व परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांच्या हस्ते देण्यात आले. कागल तालुका निमंत्रक अॅड. दयानंद पाटील-नंद्याळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. परिषदेच्या तालुका कार्याध्यक्षपदी सरपंच दीपक अंगज (चिमगाव), उपाध्यक्षपदी सरपंच अमर कांबळे (शेंडूर), सरचिटणीसपदी सरपंच अनिल कांबळे (सुरुपली), तालुका समन्वयकपदी सरपंच बंडेराव सूर्यवंशी (पिंपळगाव बु), कागल तालुका कायम निमंत्रकपदी सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय कसलकर (हणबरवाडी) यांची निवड करण्यात आली. कागल तालुका परिषदेच्या महिला आघाडीसाठी कार्याध्यक्षपदी सरपंच सुप्रिया भोसले (सुळकुड), उपाध्यक्षपदी सरपंच सुनीता चौगुले (म्हाकवे), सरचिटणीसपदी सरपंच पुनम सुळगावें (एकोंडी), तालुका महिला समन्वयकपदी सरपंच अश्विनी गुरव (बेनिक्रे) यांची निवड करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com