
कागल : चिमुकल्यांचा व माता-भगिनींचा सत्कार सोहळा
दुर्धर आजारांतून जीवनदान मिळालेल्या
चिमुकल्यांचा आज कागलला सत्कार सोहळा
कागल : दुर्धर व गंभीर आजारांवर मोफत शस्त्रक्रिया व उपचार होऊन जीवनदान मिळालेल्या चिमुकल्यांचा व माता-भगिनींचा सत्कार सोहळा आमदार हसन मुश्रीफ यांचा प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे. रविवारी (ता.२१) दुपारी तीन वाजता येथील बापूसाहेब महाराज चौकात हा सत्कार सोहळा होणार आहे. आमदार हसन मुश्रीफ यांनी धर्मादाय कायद्यामध्ये आमूलाग्र बदल केल्यामुळे लाखो लोकांना जीवदान मिळाले आहे. कोरोना काळानंतर अंदाजे एक हजारहून अधिक बालके व इतर रुग्णांना जीवदान दिले आहे. तसेच महात्मा फुले जीवनदायी योजना व इतर योजनांच्या माध्यमातून हजारो रुग्णांचे प्राण वाचवले आहेत. या कार्यामध्ये ज्यांनी प्रयत्न आणि सहकार्य केले त्या आरोग्यसेवेच्या सेवायात्रींचा कृतज्ञपर सत्कार समारंभ आयोजित केला आहे .या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात आले आहे. या कार्यक्रमात आयुष्यमान भारत योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या दोन योजनांमध्ये ७५ हजारहून अधिक नागरिकांची नोंदणी पूर्ण झाली आहे, त्या नागरिकांना प्राथमिक स्वरूपात योजना कार्डाचे वाटप होणार आहे .