Tue, October 3, 2023

प्रारूप आराखडा हरकतींवर
कागलला उद्यापासून सुनावणी
प्रारूप आराखडा हरकतींवर कागलला उद्यापासून सुनावणी
Published on : 22 May 2023, 2:53 am
प्रारूप आराखडा हरकतींवर
कागलला उद्यापासून सुनावणी
कागल, ता. २२ : कागल नगरपालिकेचा प्रारूप विकास आराखडा जाहीर करण्यात आला असून नागरिकांच्या सूचना आणि हरकती मागवण्यात आल्या होत्या. पालिकेकडे ३२४ मिळकत धारकांनी हरकती घेतल्या असून त्यांची सुनावणी २३ ते २५ मे अखेर घेण्यात येणार आहे. पालिकेच्या इमारतीत ही सुनावणी पार पडणार आहे.
कागल शहराचा तब्बल २५ ते ३० वर्षांनंतर प्रारूप विकास आराखडा जाहीर करण्यात आला होता. त्याला शहरातील काही मिळकत धारकांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला आहे. तसेच मेळावे घेऊन पालिकेवर नागरिकांनी मोर्चा काढला होता. पालिका प्रशासनाने शहरातील मिळकतधारकांच्या लेखी सूचना आणि हरकती मागवल्या होत्या. पालिकेकडे ३२४ मिळकतधारकांनी हरकती घेतल्या असून २३ ते २५ मेअखेर सकाळी ११ ते ५ या वेळेत सुनावणी पार पडणार आहे.