कागल : हमिदवाडा कारखाना बिनविरोधसाठी समरजितसिंह घाटगे यांचे प्रसिद्धी पत्रक

कागल : हमिदवाडा कारखाना बिनविरोधसाठी समरजितसिंह घाटगे यांचे प्रसिद्धी पत्रक

हमिदवाडा कारखान्याची
निवडणूक बिनविरोध व्हावी

समरजितसिंह घाटगे ः गट-तट न मानता बिनविरोधासाठी सहकार्य करण्याचे आवाहन


कागल, ता. २२ : लोकनेते सदाशिवराव मंडलिक कागल तालुका सहकारी साखर कारखाना हमिदवाडा-कौलगे या साखर कारखान्याची २०२३-२८ या वर्षांकरिता निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. कारखान्याची ही पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध करण्यासाठी जाहीर पाठिंबा देत असल्याचे पत्रक भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
पत्रकात म्हटले आहे, स्व.खासदार सदाशिवराव मंडलिक संस्थापक असलेला हा साखर कारखाना त्यांच्या आशीर्वादाने व खासदार संजय मंडलिक यांच्या नेतत्वाखाली चांगला व सुरळीतपणे सुरू आहे. त्यामुळे या कारखान्याची होऊ घातलेली पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध व्हावी त्यासाठी आमचे सर्वोतोपरी सहकार्य राहील.''विना सहकार,नाही उद्धार'' हे ब्रीद उराशी बाळगून स्व.विक्रमसिंह घाटगे आणि स्व.खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी जिल्ह्याच्या समाजकारणात आणि राजकारणात अत्यंत प्रामाणिक आणि नम्रपणे सहकार खोलवर रुजविला आहे. ही बाब सर्वश्रुतच आहे. तसेच कोणतीही सहकारी संस्था जर आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावयाची असेल तर त्या संस्थेवर होणारा अनावश्यक खर्च टाळला पाहिजे. विशेषतः निवडणुकीवर होणारा वारेमाप खर्च हा कोणत्याही सहकारी संस्थेस आर्थिकदृष्ट्या परवडणारा नसतो, त्यामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका बिनविरोध करण्याकडे त्यांचा कल होता. त्या अनुषंगाने बहुजनांच्या या श्रम मंदिराची होऊ घातलेली पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध करण्यासाठी इतर सर्वांनीही सहकार्य करावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com