Wed, October 4, 2023

कागल : ५० हजाराची बॅग लंपास
कागल : ५० हजाराची बॅग लंपास
Published on : 22 May 2023, 6:12 am
कागल येथे ५० हजार असलेली बॅग चोरली
कागल : येथील विराज सिटीतील एका बँकच्या दारात लावलेल्या मोटारसायकलच्या हँन्डलला अडकवलेली ५० हजार रुपये असलेली पैशाची बॅग अज्ञात चोरट्याने लंपास केली. याबाबतची फिर्याद चंद्रकांत सत्तू दिवटे (वय ६४, अखिलेश पार्क , कागल ता. कागल) यांनी कागल पोलिसांत दिली आहे. दुपारी सव्वा एकच्या सुमारास ही घटना घडली. बॅगेमध्ये पासबुक, चेकबुक व रोख रक्कम होती.