कागल : कागल प्रारूप विकास आराखडा हरकतींवर सुनावणीस प्रारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कागल : कागल प्रारूप विकास आराखडा हरकतींवर सुनावणीस प्रारंभ
कागल : कागल प्रारूप विकास आराखडा हरकतींवर सुनावणीस प्रारंभ

कागल : कागल प्रारूप विकास आराखडा हरकतींवर सुनावणीस प्रारंभ

sakal_logo
By

१२२ मिळकतधारकांची
पहिल्या दिवशी सुनावणी

कागल, ता. २३ : कागल नगरपालिकेच्या माध्यमातून प्रारूप विकास आराखड्यावर घेतलेल्या हरकतींवर मंगळवारपासून सुनावणीस प्रारंभ झाला. तीन दिवस चालणाऱ्या सुनावणीत ३२४ हरकतींवर सुनावणी होणार आहे. मंगळवारी पहिल्या दिवशी १२२ हरकतींवर समितीसमोर सुनावणी झाली.
कागल शहराचा प्रारूप विकास आराखडा तयार केला आहे. त्यासाठी नागरिकांच्या हरकती मागविल्या आहेत. शहरातील प्रशस्त रस्ते, उद्याने व इतर विकासकामांसाठी जमिनीवर आरक्षण टाकले आहे. याबाबत पालिकेने नागरिकांच्या हरकती मागवल्या होत्या. शहरातील ३२४ मिळकतधारकांनी यावर हरकती घेतल्या होत्या. याची सुनावणी पालिकेच्या सभागृहात मंगळवारी झाली. सेवानिवृत्त नगररचनाकार सर्जेराव मुगडे, आर. पी. पाटील, डी. वाय. पाटील, अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख इंद्रजित जाधव आणि पालिकेचे मुख्याधिकारी श्रीराम पवार यांच्या समितीसमोर नागरिकांनी हरकती नोंदवल्या.
मुळात आपल्या जमिनीचे क्षेत्रफळ अत्यल्प आहे. यावर पालिकेने अनेक मोठे रस्ते आणि इतर विकासकामांसाठी आरक्षण टाकले आहे. त्यामुळे आपण भूमिहीन होणार आहोत. त्यामुळे आपल्यावर अन्याय होत असल्याने याबाबत विचार व्हावा, अशी विनवणी काही मिळकतधारकांनी समितीसमोर केली. गुरुवार २५ मेपर्यंत ही सुनावणी चालणार आहे.