कोल्हापूर सनगर पतसंस्था बिनविरोध

कोल्हापूर सनगर पतसंस्था बिनविरोध

05141
महादेव सनगर; आशा कारंडे

कोल्हापूर सनगर पतसंस्था बिनविरोध
कागल : कोल्हापूर जिल्हा सनगर समाज नागरी सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. संस्थेच्या अध्यक्षपदी महादेव राजाराम सनगर (माले) व उपाध्यक्षपदी आशा आनंदराव कारंडे यांची बिनविरोध फेरनिवड केली. नव्या संचालक मंडळात संगीता मोहन गोंजारी, संदीप चंद्रकांत सणगर-नाळे, शिवाजी पांडुरंग डमकले या नवोदितांना संधी देण्यात आली. बिनविरोध झालेल्या निवडणुकीत संचालकपदी अरुण ढोबळे, सूर्यकांत लिमकर, संजय नवाळे, नामदेव राऊत, विनोद जमदाडे, रेखाताई परमाळे यांना पुन्हा संधी दिली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून चंद्रकांत इंगवले यांनी काम पाहिले. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मारुतीराव कारंडे व सभासदांचे सहकार्य लाभले. व्यवस्थापक किशोर लिमकर यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com