कागल : ( सुधारित) टायपिंग इन्स्टिट्यूट जळून खाक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कागल : ( सुधारित) टायपिंग इन्स्टिट्यूट जळून खाक
कागल : ( सुधारित) टायपिंग इन्स्टिट्यूट जळून खाक

कागल : ( सुधारित) टायपिंग इन्स्टिट्यूट जळून खाक

sakal_logo
By

05149
कागल : टायपिंग इन्स्टिट्यूटला लागलेली आग.

...

कागलमध्ये टायपिंग इन्स्टिट्यूट जळून खाक
कागल, ता. २७ : रात्री साडेनऊच्या सुमारास शार्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत येथील परफेक्ट कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट खाक झाले. या आगीत इन्स्टिट्यूटमधील ३० कॉम्प्युटर, महत्त्वाची कागदपत्रे, प्रमाणपत्रे व फर्निचर आदी साहित्य खाक झाले.
येथील सुजाउद्दीन सय्यद यांची निपाणी वेशीजवळ ब्रह्माकुमारी केंद्रालगत परफेक्ट कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट नावाची संस्था आहे. शहर व परिसरातील विद्यार्थ्यांना टायपिंगचे शिक्षण देणारी कागल शहरातील सर्वांत जुनी संस्था म्हणून या संस्थेकडे पाहिले जाते. सध्या या संस्थेत ३० संगणक आहेत. रात्री साडेनऊच्या सुमारास संस्था बंद असल्याने आगीने धूर बाहेर आला. परिसरात धुराचा वास येऊ लागल्याने संस्थेच्या परिसरातील लोक घराबाहेर आले. त्याचवेळी आगीने रौद्ररूप धारण केले. या आगीत संगणक कक्षातील सर्व ३० संगणक, बॅटरी बॅकअप तसेच महत्त्वाची कागदपत्रे, प्रमाणपत्रे, फर्निचर खाक झाले. संस्थेचे मोठे नुकसान झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. नगरपालिकेच्या अग्निशमन गाड्यांनी ही आग आटोक्यात आणली.