कागल : अपघात महिला ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कागल : अपघात महिला ठार
कागल : अपघात महिला ठार

कागल : अपघात महिला ठार

sakal_logo
By

05155
....
कागल - निढोरी मार्गावर
अपघातात महिला ठार

मुलाच्या समोरच आईचा दुर्दैवी मृत्यू

कागल, ता. २८ : कागल - निढोरी मार्गावर वाघजाई घाटात मोपेड मोटारसायकल व कारची समोरासमोर धडक होऊन महिला जागीच ठार झाली. संगीता सुनिल कुंभार (वय ४०, रा. बोरगाव, ता. निपाणी) असे या महिलेचे नाव आहे. मुलगा शुभम सुनील कुंभार (वय २०) हा जखमी झाला आहे. या घटनेची नोंद कागल पोलिसांत झाली. दरम्यान, आईच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, संगीता कुंभार या आपला मुलगा शुभम याच्या मोपेडवरून देवदर्शनासाठी आदमापूरला निघाल्या होत्या. याचवेळी कागलकडे कार जात होती. शुभमचा वेग अधिक होता. त्याचे नियंत्रण सुटल्याने समोरुन येणाऱ्या कारच्या डाव्या बाजूला जाऊन मोपेड धडकली. यावेळी स्कूटरवरील संगीता कुंभार या खाली कोसळल्या व रस्त्यावर जोरात आदळल्या. डोक्याला मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक रविकांत गच्चे व सहकारी पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. याबाबत शुभम कुंभार याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कागल पोलिस अधिक तपास करीत आहेत.