
कागल : हमिदवाडा कारखान्याच्या निवडणुकीत १० उमेदवारी अर्ज अवैध
हमिदवाडा कारखान्याच्या
निवडणुकीत १० उमेदवारी अर्ज अवैध
कागल, ता. २९ : हमिदवाडा (ता. कागल) येथील लोकनेते सदाशिवराव मंडलिक साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी ५८ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. या अर्जांची आज छाननी करण्यात आली. यापैकी एका विद्यमान संचालकांसह १० उमेदवारी अर्ज अपात्र झाले. सूचकांसह काही उमेदवारी अर्ज दाखल केलेल्यांकडून शेअर्सच्या रक्कमेची थकबाकी, कारखान्याला ऊस पुरवठा न करण्याच्या कारणास्तव हे उमेदवारी अर्ज अपात्र ठरविण्यात आले आहेत.
अवैध झालेले अर्ज असेः मुरगूड गट-आनंदा गोपाळा देवडकर (सोनगे), बोरवडे गट-दिनकर बाळा पाटील (कौलगे), मारुती राऊ फराकटे (बोरवडे), कागल गट-सुधीर श्रीपती पाटोळे (एकोंडी), रामचंद्र तुकाराम पोवार (सिध्दनेर्ली), निवास महादेव पाटील (बाचणी), सुधीर रत्नाप्पा पाटील-दोन अर्ज (सिध्दनेर्ली), महिला प्रवर्ग - मंगल गणपती भारमल (हळदी), इतर मागास प्रवर्ग- बळवंत मारुती परीट (सिध्दनेर्ली) अशा एकूण ९ उमेदवारांचे १० अर्ज अवैध झाले आहेत.
अर्ज दाखल केलेल्या विद्यमान संचालकांपैकी दिनकर बाळा पाटील यांचा एकमेव अर्ज अवैध ठरला आहे. दाखल केलेले सर्वच अर्ज हे मंडलिक गटातूनच आहेत. त्यामुळे बिनविरोध निवडणुकीला बळ मिळाले असले तरी २१ जणांची निवड करताना गटनेत्यांची दमछाक होणार असल्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
दरम्यान, ही छाननी निवडणूक निर्णय अधिकारी प्रांताधिकारी सुशांत बनसोडे व सहाय्यक निवडणूक अधिकारी संभाजी पाटील यांनी घेतली. आज मंगळवारी पात्र उमेदवारांची यादी प्रसिध्द होणार असून १३ जून पर्यंत उमेदवारी अर्ज माघारीची मुदत आहे.