
कागल : मुश्रीफ यांना मानपत्र देऊन सत्कार करण्यात येणार
मंत्री हसन मुश्रीफ यांचा उद्या सत्कार
कागल : तालुका मातंग समाजातर्फे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०३ वी जयंती होणार आहे. यानिमित्त वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांना मानपत्र देऊन सत्कार होणार आहे. रविवारी (ता. ३) शाहू मेमोरियल हॉलमध्ये कार्यक्रम होईल, अशी माहिती दलितमित्र बळवंतराव माने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. गैबी चौकात महात्मा जोतिराव फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे यांचे एकत्रित पुतळे उभारण्याचे काम वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नातून झाले. यानिमित्त मंत्री मुश्रीफ यांचा मानपत्र देऊन सत्कार होईल. कार्यकमास खासदार संजय मंडलिक, आमदार राजू आवळे, माजी आमदार संजय घाटगे, राजीव आवळे उपस्थित राहणार आहेत. यावेळी डीपीआयचे प्रा. सुकुमार कांबळे यांचे व्याख्यान आहे. पत्रकार परिषदेस संजय हेगडे, प्रकाश तिराळे, सुरेश कांबळे, संजय आवळे, सुरेश लोखंडे उपस्थित होते.