कान्हरवाडीत ''वाळू'' उपशाच्या वादातून तरुणाचा खून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कान्हरवाडीत ''वाळू'' उपशाच्या वादातून तरुणाचा खून
कान्हरवाडीत ''वाळू'' उपशाच्या वादातून तरुणाचा खून

कान्हरवाडीत ''वाळू'' उपशाच्या वादातून तरुणाचा खून

sakal_logo
By

फोटो : मयत सचिन हणमंत मदने
KGN23B04182

‘वाळू’ उपशाच्या वादातून
कान्हरवाडीत तरुणाचा खून
सहा जणांच्या टोळक्याचा दोघा सख्ख्या भावांवर हल्ला: एक गंभीर
कडेगाव, ता. ४ : कान्हरवाडी (ता. कडेगाव) येथे येरळा नदीच्या पात्रातून वाळूची खेप भरून आणल्यावरून येथील सहा जणांच्या टोळक्याने तलवार, कुऱ्हाड, लोखंडी गज आणि दांडक्याने दोघा सख्ख्या भावावर हल्ला करून एकाचा खून केला, तर दुसरा गंभीर जखमी झाला. सचिन हणमंत मदने (वय-३२, रा. कान्हरवाडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे, तर खंडू हणमंत मदने (वय-३५, रा. कान्हरवाडी) हा तरुण गंभीर जखमी झाला.
याप्रकरणी अशोक हणमंत मदने (रा. कान्हरवाडी) यांनी कडेगाव पोलिसांत फिर्याद दिली आहे. हा प्रकार शनिवारी (ता. ३) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास कान्हरवाडी-येतगाव रस्त्यावर घडला. याप्रकरणी कडेगाव पोलिसांनी चार संशयितांना रात्री उशिरा ताब्यात घेतले.
याप्रकरणी संशयित लक्ष्मण जगन्नाथ मदने, किरण लक्ष्मण मदने, सूरज संजय मदने, सौरभ संजय मदने, करण गुलाब पाटोळे, महेंद्र बबन पाटोळे (सर्व रा. कान्हरवाडी) या सहा जणांवर कडेगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत कडेगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कान्हरवाडी येथे शनिवारी (ता.३) रात्री दहा वाजण्याचा सुमारास कान्हरवाडी-येतगाव रस्त्यावर भगवान ज्ञानू मदने यांच्या शेताजवळ संशयित लक्ष्मण मदने, किरण मदने, सूरज मदने, सौरभ मदने, करण पाटोळे, महेंद्र पाटोळे यांनी बेकायदेशीर जमाव जमवला आणि धारदार शस्त्रे घेऊन सचिन हणमंत मदने व खंडू हणमंत मदने यांच्याशी येरळा नदीचे पात्रातून वाळूची खेप भरून आणल्यावरून जोरदार वादावादी सुरू केली. यावेळी संशयित सूरज मदनेने तलवारीने व किरण मदनेने चाकूने सचिन हणमंत मदने याच्या पाठीवर वार केले. तसेच लक्ष्मण मदनेने कुऱ्हाडीने खंडू मदनेच्या खांद्यावर व पायावर वार केले. तसेच संशयित सौरभ मदने, करण पाटोळे व महेंद्र पाटोळे यांनी हातातील लोखंडी गजाने, तसेच लाकडी दांडक्याने सचिन व खंडू या दोघांना मारहाण केली. त्यामध्ये सचिन हणमंत मदने अंगावर घाव वर्मी बसल्याने गंभीर जखमी होऊन जमिनीवर कोसळला. यावेळी मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेत असतानाच वाटेत त्याचा मृत्यू झाला. खंडू मदने गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर कऱ्हाड येथील कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
संशयितांनी मृत सचिन मदने याच्या मोटारीच्या (एम.एच.१२ डी.टी.२७) काचा फोडून नुकसान केले आहे. या घटनेची कडेगाव पोलिसांत अशोक मदने यांनी फिर्याद दिली, तर सहायक पोलिस निरीक्षक संतोष गोसावी यांच्यासह पोलिस पथकाने तत्काळ कान्हरवाडी येथे घटनास्थळी धाव घेतली व घटनेचा पंचनामा करून आरोपींच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना केली. या घटनेची कडेगाव पोलिस ठाण्यात नोंद झाली असून, अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक संतोष गोसावी हे करीत आहेत.