फोटो ओळ..शेंडापार्क येथील सदनिकांची झालेली दुरवस्था | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फोटो ओळ..शेंडापार्क येथील सदनिकांची झालेली दुरवस्था
फोटो ओळ..शेंडापार्क येथील सदनिकांची झालेली दुरवस्था

फोटो ओळ..शेंडापार्क येथील सदनिकांची झालेली दुरवस्था

sakal_logo
By

20714
शेंडापार्क ः येथील सदनिकांची झालेली दुरवस्था.

शेंडापार्क सदनिकांची दुरवस्था
-
चौकट, खिडकीसह लाकडी साहित्याची चोरी

प्रकाश पाटील ः सकाळ वृत्तसेवा
कंदलगाव ता.९ ः शेंडापार्क सदनिकांत १९९७ पासून जशी रुग्णसंख्या कमी झाली तशी या परिसराच्या अधोगतीलाही सुरुवात झाली. गेल्या पंचवीस वर्षापासून या परिसराची देखभाल-दुरूस्तीअभावी दुरवस्था झाली असून, येथील वापरात असलेल्या दोन-चार सदनिका सोडल्या तर इतर सदनिकांचे साहित्य चोरीला जात असल्याचे चित्र आहे.
छत्रपती राजाराम महाराजांनी जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील कुष्ठरोग्यांना एकत्र उपचार व्हावेत या दुरदृष्टीतून शेंडापार्क कुष्ठधामची स्थापना करून कुष्ठरोग्यांना दिलासा दिला. त्यावेळी त्यांचे राहणे, जेवण, नाष्टा तसेच औषध उपचार एकत्र करून परिसरात त्यांच्या सोयीसाठी सदनिका तयार करून त्यात त्यांचे उपचार सुरू केले. कालांतराने योग्य उपचार व औषधांमुळे रूग्णसंख्या कमी झाली तसे शासनानेही दुर्लक्ष केल्याने येथील नोकरभरतीसह परिसरातील मालमत्तेची दुरवस्था सुरू झाली. सध्यस्थिस्तीत या ठिकाणी सात जणांवर उपचार सुरू आहेत.

चोरट्यांचा वावर...
परिसर निर्जन असल्याने ना धाक, ना भीती आहे. यामुळे परिसरातील सदनिकेत अनेकदा मद्यपी बिनधास्त बसलेले असतात. या परिसरावर प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने लाकडी साहित्याची मोडतोड तसेच ते चोरीला जात आहे.

कोट
सुभाषनगर ते आर. के. नगर यामध्ये येणाऱ्या या शेंडा पार्कच्या परिसरात नागरी वस्ती नसल्याने या परिसरात प्रेमीयुगुल, मद्यपींसह चोरटे दिवसभर फिरत असतात. संबधित विभागाने या भागात गस्त वाढवावी.
- उत्तम पाटील, उपाध्यक्ष, समाजवेध दक्षता फाउंडेशन

कोट
शासनाकडील सर्व पदे रिक्त झाल्याने जिल्हा परिषद आरोग्य विभागाने एक पाऊल पुढे टाकून शेंगपार्कातील रुग्णांवर उपचार सुरू केले आहेत. येथील सदनिका जिल्हा परिषेदेच्या ताब्यात नाहीत.
- डॉ. योगेश साळी, जिल्हा आरोग्य अधिकारी

Web Title: Todays Latest Marathi News Kgo22b01589 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top