
फोटो ओळ..१)मोरेवाडी पेट्रोल पंपा शेजारी ओढा पात्र.२) पाचगाव शांतीनगरमधिल ओढा.
कंदलगाव, पाचगाव परिसरातील
ग्रामपंचायती नालेसफाईसाठी सज्ज
कंदलगाव, ता. १० ः दक्षिणेतील कंदलगाव, पाचगाव व मोरेवाडी ग्रामपंचायतींनी पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई जून महिन्याच्या आधीच करायचे ठरविले असून, त्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवली आहे.
पुढील आठवड्यापासून या नालेसफाईला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. प्रथम टप्प्यात गावात येणाऱ्या मोठ्या नाल्यांची स्वच्छता करून गरजेनुसार अंतर्गत नाल्यांची स्वच्छता होणार आहे.
चौक
दृष्टिक्षेपातील नाले..
१) पाचगाव- रेणुका नगर, शिक्षक कॉलनी, मूळगाव, शांतीनगर, गिरगाव रस्ता
२) कंदलगाव- कमानी रस्ता, रेणुका नगर रस्ता, श्रीराम दूध संस्था, तालिम संकुल, वाडीचा आड परिसर
३) मोरेवाडी- पूर्व-पश्चिम ओढा, चित्रनगरी ओघळ, म्हाडा कॉलनी ओढा, जुनी स्मशानभूमी परिसर, बेळगावकर कॉलनी आदी.
चौकट
धोकादायक नाले..
१) पाचगाव पंचशिल कॉलनी, रेणुका नगर ओढा.
२)मोरेवाडी जुनी म्हाडा कॉलनी, विद्यानगर,धन्वंतरी नगर परिसर
कोट
पावसाळ्यापूर्वी नाले स्वच्छतेचे नियोजन झाले आहे. पुढील आठवड्यापासून प्रत्यक्ष स्वच्छतेला सुरुवात हाईल. पहिल्या टप्प्यात धोकादायक नाल्यांची स्वच्छता होईल.
-अर्चना पाटील, सरपंच, कंदलगाव.
-रूपाली बाजारी, सरपंच, मोरेवाडी.
कोट
२२ मेपासून नालेसफाईला सुरवात होईल. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्या लक्षात घेऊन पावसाच्या अगोदर सर्व नाले स्वच्छता करून घेऊ.
-संग्राम पाटील, सरपंच, पाचगाव
Web Title: Todays Latest Marathi News Kgo22b01592 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..