
फोटो ओळ..चित्रनगरीच्या याच सिमेंट पाईपमधून मोठ्या प्रमाणावर पावसाळ्यात पाणी वाहते.(छायाचित्र.प्रकाश पाटील)
02999
कंदलगाव ः चित्रनगरीच्या याच सिमेंट पाईपमधून मोठ्या प्रमाणावर पावसाळ्यात पाणी वाहते. (छायाचित्र ः प्रकाश पाटील)
पावसाच्या पाण्याचे नियोजन
चित्रनगरी प्रशासनाने करावे
स्थानिक नागरिकांची मागणी
कंदलगाव, ता. १२ ः चित्रनगरी प्रशासनाने आपल्या संपूर्ण हद्दीवर संरक्षक भिंत बांधून आपला परिसर सुरक्षित ठेवला आहे; मात्र या परिसरातील उंच-सखल भागात साचणारे पावसाचे पाणी परिसरातून बाहेर पडण्यासाठी मोठ्या सिमेंट पाईप ठिकठिकाणी घातल्या आहेत. याच पाईपमधून बाहेर पडणाऱ्या पाण्याचा मोरेवाडी हद्दीतील वाढीव नागरी वस्त्यांना त्रास होत असल्याने या पाण्याचे नियोजन व्हावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांतून होत आहे. गतवर्षी चित्रनगरीतील पावसाचे पाणी शिरल्याने मोरेवाडी येथील इंदाईनगरमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
हा परिसर डोंगराळ असल्याने पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर जमा होते. परिसरात विहीर अथवा शेततळे केल्यास पावसाच्या पाण्याचा परिसरातील बागबगीचा, झाडांसाठी वापर होऊ शकतो. पाणी साठवण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे.
चौकट
लोंढा भीतीदायक...
पूर्वी या भागात नागरी वस्ती नसल्याने या पाण्याचा त्रास होत नव्हता. संरक्षक भिंतीशेजारी अनेकांनी स्वतःच्या जागेत प्लॉट पाडून तिथे नागरी वस्ती तयार झाली आहे. चित्रनगरीतील उंच-सखल भागामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी साचून पाण्याचा लोंढा बाहेर पडून शेजारील वस्तीत घुसत आहे. ही स्थिती दोन वर्षांपासून मोठी झाली आहे.
कोट
नागरिकांच्या तक्रारीनुसार चित्रनगरी प्रशासनास स्मरणपत्र पाठवून पावसाच्या पाण्याची व्यवस्था नाल्यात करावी, असे सांगितले आहे. पावसाळ्यापूर्वी या पाण्याची व्यवस्था करू.
-रुपाली बाजारी, सरपंच, मोरेवाडी.
Web Title: Todays Latest Marathi News Kgo22b01594 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..