फोटो ओळ..संग्रहित छायाचित्र वापरावे. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फोटो ओळ..संग्रहित छायाचित्र वापरावे.
फोटो ओळ..संग्रहित छायाचित्र वापरावे.

फोटो ओळ..संग्रहित छायाचित्र वापरावे.

sakal_logo
By

(संग्रहित छायाचित्र वापरावेत)


चूलच बरी म्हणण्याची वेळ
ग्रामीणसह उपनगरांतील चित्र; इंधन, गॅसच्या किमती सामान्यांच्या आवाक्याबाहेर

प्रकाश पाटील ः सकाळ वृत्तसेवा
कंदलगाव ता.१२:
केंद्र सरकारने ''पंतप्रधान उज्ज्वला योजना''सुरू करून महिलांची धुरापासून सुटका केली. मात्र, सध्या इंधनाबरोबर गॅसच्या किमतीही आवाक्याबाहेर गेल्याने ग्रामीणसह शहरातील अनेक कुटुंबे पुन्हा चुलीकडे वळल्याचे चित्र आहे.
द्रारिद्र्य निर्मूलन, ग्रामीण कुटुंब कल्याण, मेक इन इंडिया, महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारने मे २०१६ मध्ये पंतप्रधान उज्ज्वला योजनेची घोषणा केली. सरपण गोळा करण्यासाठी होणारी भटकंती थांबावी, महिलांचे मानसिक, शारीरिक आरोग्य सुदृढ रहावे, या उद्देशाने दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाला केवळ १६०० रुपये भरून गॅसजोडणी देण्यात आली होती. सुरूवातीचा पहिला व दुसरा टप्पा पार पडला.
ग्रामीण कुटुंबाचा हंगामी रोजगार, दरडोई उत्पन्न, द्रारिद्र्याचा वाढता निर्देशांक अशा विपरित परिस्थितीमध्ये एलपीजी गॅसच्या दिवसागणिक वाढणाऱ्या किमती बघून ''उज्ज्वला'' पुन्हा चुलीकडे वळल्याचे चित्र आहे.
शेतीची कामेही मशिनरीने होत असल्याने मोलमजुरीचा प्रश्न सतावत असताना दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तूंच्या किमतीचे दर गगनाला भिडल्याने सर्वसामान्य कुटुंबांचे गणित बिघडले आहे. त्यात गॅसचे दर वाढल्याने ग्रामीण जनजीवन अस्वस्थ असून, पुन्हा आपली चूलच बरी असे म्हणण्याची वेळ आली आहे.

कोट
''उज्ज्वला''योजनेमुळे खरोखर धुरापासून महिलांची सुटका होईल असे वाटले होते. मात्र, वाढती महागाई, गॅसचे दर वाढल्याने पुन्हा चुलीसमोर बसायची वेळ आली. संपूर्ण महिन्याचे गणित बिघडले आहे.
-आशाबाई निर्मळ, महिला

कोट
कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या, व्यवसाय बदलल्याने अजूनही घडी बसलेली नाही. त्यात दिवसागणिक गॅस, इंधनाचे वाढते दर यामुळे ''उज्ज्वला''नकोशी झाली आहे.
-शांताबाई सरनाईक, महिला

कोट
दोन वर्षांत मोठ्या प्रमाणावर इंधन, गॅस दरवाढ झाली. त्याचा परिणाम सर्व दैनंदिन वस्तूंवर होत असल्याने शहरापेक्षा ग्रामीण भागाची स्थिती भयावह आहे. हाताला काम मिळत नसल्याने पोट भरायचे कसे हा प्रश्न आहे. गॅस सिलिंडर ठेवून चूल वापरात आणली आहे.
-गीता पाटील, सदस्या, आनंदी महिला बचत गट.

चार्ट
दृष्टिक्षेपात गॅस दरवाढ
नोव्हेंबर २०२०- ५९४
डिसेंबर २०२०- ६९४
फेब्रुवारी २०२१- ७६९
मार्च २०२१- ८१९
ऑक्टोबर २०२१- ८९९
एप्रिल २०२२- ९४९
मे २०२२- १०००

Web Title: Todays Latest Marathi News Kgo22b01596 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top