
टुडे ३
03129
शेंडापार्क ः येथे नालात साचलेला कचरा.
शहराच्या वेशी कचऱ्याने तुंबल्या
नालेसफाईचा अभाव ; परिसरात दुर्गंधी, स्वच्छतेची मागणी
प्रकाश पाटील-सकाळ वृत्तसेवा
कंदलगाव, ता.२५ ः दक्षिण विभागातून शहरात येण्यासाठी उंचगाव, सरनोबतवाडी, मोरेवाडी,आर.के.नगर, पाचगाव, कळंबा व फुलेवाडी येथून येणाऱ्या वेशी कचऱ्याने तुडूंब भरल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. या वेशींची स्वच्छता करण्याची नागरीकांतून मागणी होत आहे.
प्लास्टिक पिशवीत भसलेला कचरा,कापसाची गादी, जुनी कपडे,चामड्याच्या वाद्या,गच्चपोती भरून कचरा,आडगळीचे साहित्य,वैद्यकिय वेस्टेज,व्यवसाईक स्क्रॅप, रिक्षाचे टफ,सिटकव्हर्स यासारख्या अनेक कचऱ्याने वेशीवरील नाले भरले आहेत. प्रत्येक वर्षी होणाऱ्या नाले सफाईला या वर्षी जून महिना संपत आला तरी हात लागला नसल्याने पावसाळ्यात प्रवाशांची कसरत होणार आहे.
शेंडापार्क रस्त्यावरील नाला गायब..
आर.के.नगरहून शहरात येणाऱ्या शेंडा पार्क रस्त्याच्या दुतर्फा असणारे नाले मातीने,कचऱ्याने भरुन मुळचे नाले गायब झाले आहेत.गतवर्षी माजी उपमहापौर भुपाल शेटे यांनी मोहिम राबवून नाले स्वच्छता केली होती.या वर्षी मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.
चौकट
अखंड पाणी रस्त्यावर
नगरोत्स्थानातून शेंडापार्क रस्त्याचे काम चांगले झाले आहे.मात्र रस्त्याच्या दोन्ही बाजूला नाले नसल्याने पावसाचे पाणी अखंडपणे रस्त्यावरून वाहत असते.वाहतूक वर्दळ व अवजड वाहनामुळे चांगला रस्ता खराब होण्याची चिन्हे आहेत.
शहरातील मुख्य प्रवाह स्वच्छ होताच शेंडापार्क, योगेश्वरी कॉलणीतील नालेसफाई मोहिम हाती घेतली जाईल. पुढील आठवड्यात या परिसरात स्वच्छता होईल.
- जयवंत पोवार.मुख्यआरोग्य अधिकारी,महानगर पालिका.
कोट.
शहरातून बाहेर पडणारे रस्ते चांगल्या स्थितीत आहेत.मात्र नालेसफाई ऐवजी रस्त्यावर पाणी येऊन रस्ते खराब होण्याची शक्यता आहे.
- रियाज डांगे,आर.के.नगर.
Web Title: Todays Latest Marathi News Kgo22b01662 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..