
फोटो ओळ..सुभाषनगर रिंगरोड चौकात गळती काढणेसाठी खोदलेला खड्डा.
03166
सुभाषनगर ः रिंग रोड चौकात गळती काढण्यासाठी खोदलेला खड्डा.
गळतीची मालिका कायम
सुभाषनगर रिंग रोड चौकातील चित्र; नागरिक हैराण; गढूळ पाण्याने खड्डा भरला
प्रकाश पाटील ः सकाळ वृत्तसेवा
कंदलगाव, ता. ५ ः सुभाषनगर भाजी मंडईशेजारील रिंग रोड चौकात दोन आठवड्यांपूर्वी गळती काढून खड्डा भरला होता; मात्र दोन दिवसांपासून या खड्ड्यातून पाणी उमळू लागल्याने पुन्हा गळती काढण्यासाठी खोदाई करून खड्डा खणला आहे; मात्र दोन दिवसांच्या पावसामुळे गढूळ पाण्याने खड्डा भरला असून यातील गळती काढताना प्रशासनाची कसरत होणार आहे.
शेंडापार्क पाण्याच्या टाकीतून सुभाषनगर, वर्षानगरसह परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला मुख्य चौकात गळती लागून लाखो लिटर पाणी वाया जात होते.
स्थानिक नागरिकांनी अनेकदा सांगूनही गळती काढण्यासाठी जेसीबी मिळत नसल्याचे कारण पुढे केले जात असल्याची चर्चा आहे.
काही दिवसांपूर्वी गळती काढण्यात आली आणि खड्डा मातीने भरला; पण पुन्हा या खड्ड्यातून पाणी वर येऊ लागले आहे.
चौकट
दोन महिन्यांत तीनदा गळती...
दक्षिण विभागातील सुभाषनगर, जवाहरनगर, वर्षानगरसह सुमारे सात कॉलनींना या जलवाहिनीतून पाणीपुरवठा होतो. दोन महिन्यांत एकाच ठिकाणी दोनदा गळती काढली होती; मात्र आता पुन्हा त्याच ठिकाणी गळती सुरू झाल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.
चौकट
गळतीच्या खड्ड्याकडे दुर्लक्ष..
सायबर-संभाजीनगर मुख्य रिंग रोडच्या कडेला हा गळतीचा खड्डा असून, त्याकडे दुर्लक्ष होत होते. या रस्त्यावर अवजड वाहतूक रात्रंदिवस असते. त्यामुळे अपघाताची शक्यता आहे.
कोट
पाणीपुरवठा विभागाचे या परिसरात दुर्लक्ष झाले आहे. खड्डा काढून पंधरा दिवस झाले तरी कोणी फिरकलेले नाही. गेल्या वेळचा खड्डा भरून एक आठवडा झाला होता. आता पुन्हा खड्डा काढला आहे.
-सर्जेराव जाधव, भाजी विक्रेता.
कोट
या भागात जलवाहिन्या जुन्या असल्याने नेमकी गळती सापडत नाही. गळतीच्या ठिकाणी खड्डा काढला; पण त्यात गळती नसून वरच्या बाजूने पाणी येत आहे. मुख्य रस्त्यातच खोदाई करण्याची गरज भासते.
-प्रिया पाटील, शाखा अभियंता, पाणीपुरवठा महापालिका.
Web Title: Todays Latest Marathi News Kgo22b01681 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..