फोटो ओळ..कंदलगाव परिसरातील रानभाज्या.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फोटो ओळ..कंदलगाव परिसरातील रानभाज्या..
फोटो ओळ..कंदलगाव परिसरातील रानभाज्या..

फोटो ओळ..कंदलगाव परिसरातील रानभाज्या..

sakal_logo
By

03287
कंदलगाव ः परिसरातील रानभाज्या.

रानभाज्यांचे प्रमाण झाले कमी
कंदलगाव परिसरातील चित्र; कमी पावसाचा परिणाम

प्रकाश पाटील ः सकाळ वृत्तसेवा
कंदलगाव, ता. २८ ः पावसाळा सुरू होताच माळरानावर, शेताच्या गवती बांधावर तसेच कुरणात हिरव्यागार पालेभाज्यांचे दर्शन होत असते. गेल्या वर्षी पावसाचे प्रमाण असल्याने या भाज्यांचा कंदलगाव परिसरात खच लागला होता; मात्र यंदा पाऊस लागला; पण प्रमाण तुरळक असल्याने रानभाज्यांचे दर्शन कमी होत असल्याचे चित्र आहे.
कंदलगाव तलाव, डोंगर, सृष्टी पार्क, माने माळ खड्ड्यांचा माळ, पालकोबा डोंगर या परिसरात रानभाज्या मुबलक प्रमाणावर असल्याने कोल्हापूर शहर, उपनगरासह स्थानिकांची या भाज्या गोळा करण्यासाठी भटकंटी असायची; मात्र यावर्षी तुरळक पावसाने या रानभाज्या उगवल्या नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

चौकट
कंदलगाव परिसरातील रानभाज्या
टाकळा, माठ, तांदळी, घोळी, आघाडा, कुर्डू, आळंबी, पात्री, भोकर, राजगिरा, उंबर, भारंगी, आंबाडी.

चौकट
यासाठी रानभाज्या खाव्यात..
ऋतू बदलामुळे सर्दी, खोकला, पोटदुखी, डोकेदुखी यांसारखे व संसर्गजन्य आजार होत असतात. या आजारांवर मात करणारे घटक रानभाजीत असल्याने या रोगांवर बिनपैशात उपचार होतो. रानभाजीने आपले आरोग्य चांगले राहते. त्यामुळे पावसाळ्यात उगवणाऱ्या रानभाज्या खाव्यात.

कोट
काही तुरट, आंबट, तर काही किंचीत कडवट चवीच्या या भाज्या गतवर्षी भरपूर प्रमाणावर होत्या आणि त्या भरपूर प्रमाणात खाल्ल्याही; मात्र या वर्षी पावसाचे तुरळक प्रमाण व सुरुवातीचा पाऊस लांबल्याने भाजी उगवणीवर परिणाम झाल्याचे दिसत आहे.
-आर. बी. पाटील, ए. व्ही. कांबळे, एस. ए. गायकवाड.
रानभाज्या शौकिन, आर. के. नगर.

Web Title: Todays Latest Marathi News Kgo22b01736 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..