
फोटोओळ..आर.के.नगर येथील रत्नाप्पा कुंभार हायस्कूल येथे सर्पांची माहिती देताना सुनिल पुनवतकर सोबत इतर मान्यवर..
03304
आर. के. नगर ः येथील रत्नाप्पा कुंभार हायस्कूलमध्ये सर्पांची माहिती देताना सुनील पुनवतकर. शेजारी इतर मान्यवर.
दे. भ. रत्नाप्पा कुंभार हायस्कूलमध्ये
सर्पमित्र पुनवतकर यांच्याकडून जनजागृती
कंदलगाव ः आर. के. नगर येथील देशभक्त रत्नाप्पा कुंभार हायस्कूलमध्ये सर्पमित्र सुनील पुनवतकर यांनी नागपंचमीनिमित्त सर्व जातीच्या सापांबद्दल माहिती देऊन समाजातील चुकीच्या अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांना साप चावल्यानंतर ते उपचार कसे घ्यावेत हेही सांगितले. त्यांनी बोली भाषेत छोटी छोटी उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना सापाबद्दल माहिती देऊन मार्गदर्शन केले व त्यांना साप पकडण्याची आवड कशी लागली हेही त्यांनी सांगितले. यावेळी मुख्याध्यापक आर. बी. पाटील, पर्यवेक्षक वर्षा बिर्जे, स्कूल कमिटी सदस्य बी. एम. कारदगे उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रियदर्शनी माने यांनी केले. आभार कविता माळी यांनी मानले.
Web Title: Todays Latest Marathi News Kgo22b01743 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..