फोटो ओळ..पाचगाव नियंत्रण कक्षातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची स्थिती.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फोटो ओळ..पाचगाव नियंत्रण कक्षातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची स्थिती..
फोटो ओळ..पाचगाव नियंत्रण कक्षातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची स्थिती..

फोटो ओळ..पाचगाव नियंत्रण कक्षातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची स्थिती..

sakal_logo
By

03322, 03323
पाचगाव ः नियंत्रण कक्षातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची स्थिती.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची दुरुस्ती कधी?
पाचगाव उपनगर नियंत्रण कक्षांतर्गत परिसरातील स्थिती; तपासात व्यत्यय

प्रकाश पाटील ः सकाळ वृत्तसेवा
कंदलगाव, ता. ७ ः संवेदनशील पाचगाव, मोरेवाडी, कळंबा, कंदलगाव या ठिकाणी गुन्हेगारीला पायबंद बसावा म्हणून २ ऑगस्ट २०२० मध्ये जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून या परिसरात १४७ सीसीटीव्ही कॅमेरे विविध ठिकाणी बसवले. यामुळे गेल्या दोन वर्षांमध्ये चेन स्नॅचिंग, गंठण पळविणे, घरफोडी, वाहनचोरी आशा अनेक गुन्ह्याची उकल तत्काळ झाली. यामुळे गुन्हेगारांवर वचक बसल्याने बऱ्याच प्रमाणावर अशा घटना कमी झाल्याने नागरिकांतून समाधानाचे बोल येत होते. मात्र, दोन महिन्यांपासून पाचगाव नियंत्रण कक्षातील तब्बल १४१ सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. त्यामुळे परिसरात होणाऱ्या गुन्ह्याच्या तपासात अडथळे आल्याने पोलिसांच्या हाती गुन्हेगार लागेना झाले आहेत. त्यामुळे घरफोडी व गुन्हेगारांचे वर्चस्व वाढून उपनगरातील शांतता नाहीशी झाली आहे.
याबाबत नियंत्रण कक्षामध्ये चौकशी केली असता पाचगाव, कळंबा परिसरातील नवीन इमारत बांधकाम, रस्ता खोदाई यामुळे अनेकदा ठिकाणी सीसीटीव्ही केबल तुटल्या जातात. त्या संबंधित ठेकेदाराकडून तत्काळ जोडल्या जात होत्या; मात्र देखभाल व दुरुस्तीचे टेंडरची मुदत संपल्यामुळे संबंधित ठेकेदाराला नवीन वर्कऑर्डर मिळाल्याशिवाय कॅमेऱ्यांची देखभाल व दुरुस्ती होत नाही, असे सांगण्यात आले. आर. के. नगर परिसरात मुख्य चौकासह अनेक ठिकाणी कॅमेऱ्यांच्या केबल तुटल्या आहेत, तसेच सप्लाय वायर खाली लोंबकळत आहेत.
सीसीटीव्ही बसविण्यापूर्वी या भागात जबरी चोऱ्यांचे प्रकार घडले आहेत. अनेक ज्येष्ठांना एकटे गाठून जबरी चोऱ्या, हल्ले झाल्याने चोरांची दहशत होती. सीसीटीव्ही बंद पडल्याने पुन्हा तीच दहशत नागरिकांमध्ये तयार झाली आहे.

कोट
पाचगाव व मोरेवाडी ग्रामपंचायतीकडून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे वीज बिल नियमित भरले जाते. या भागातील अनेक गुन्हे थांबविण्यासाठी सीसीटीव्ही सुरू होणे अत्यंत गरजेचे आहे. नागरिकांच्या तक्रारी ग्रामपंचायतीमध्ये येतात.
-संग्राम पाटील, सरपंच, पाचगाव.
-रूपाली बाजारी, सरपंच मोरेवाडी.

Web Title: Todays Latest Marathi News Kgo22b01751 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..