केआयटी फोटो | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केआयटी फोटो
केआयटी फोटो

केआयटी फोटो

sakal_logo
By

03392
आनंद मापुसकर यांचे स्वागत करताना डॉ. व्ही. व्ही. कार्जिन्नी, तर डॉ. बी. एन.जगताप यांचे स्वागत करताना डॉ. मोहन वणरोट्टी.

केआयटीत''राष्ट्रीय शिक्षण धोरण'' कार्यशाळा
कंदलगाव ता.२३ ः कोल्हापूर इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीचे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग (स्वायत्त),कोल्हापूर व इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट,एज्युकेशनअँड रिसर्च यांच्यातर्फे ‘उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० ची अंमलबजावणी व असणारी आव्हाने’ या विषयावरील राष्ट्री. एक दिवसीय कार्यशाळा झाली.
प्रमुख अतिथी म्हणून शिक्षणतज्ज्ञ आनंद मापुसकर, आयआयटी मुंबईचे वरिष्ठ प्राध्यापक डॉ. बी. एन.जगताप यांच्या हस्ते उदघाटन झाले. डॉ. जगताप यांनी जुन्या शैक्षणिक धोरणात कालानुरूप होत गेलेले बदल यांविषयी माहिती देत राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मधील ध्येय, उद्दिष्ट्ये आणि दूरदृष्टी यावर विचार मांडले. मापुसकर यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मध्ये असणाऱ्या संधी आणि आव्हाने यावर त्यांनी सदरचे धोरण उच्च शिक्षण संस्थांना मोठ्या बहुविद्याशाखीय विद्यापीठे, महाविद्यालये आणि HEI क्लस्टर्स/नॉलेज हबमध्ये एकत्र आणेल असे मत व्यक्त केले. आर्थिक व्यवस्थापन, नेतृत्व आणि दूरदृष्टीचा अभाव, पायाभूत सुविधा, व्यवस्थापकीय भूमिकेचे आकलन, डोमेन ज्ञानाचा अभाव,संस्थात्मक विकास योजनांची माहिती दिली.
केआयटीच्या डॉ. महेश शिंदे यांनी "ओपन डिजिटल लर्निंग व त्याचे राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मधील महत्व" या विषयावर मार्गदर्शन केले. तर चौथ्या सत्रात केआयटीच्या डॉ. कपिल कदम यांनी "मॅसिव्ह ओपन ऑनलाइन कोर्स डिझाईन करणे" यावर मार्गदर्शन केले.
केआयटीचे अध्यक्ष सुनील कुलकर्णी, उपाध्यक्ष साजिद हुदली, सचिव दिपक चौगुले, अभियांत्रिकीचे संचालक डॉ. मोहन वनरोट्टी, आयएमईआरचे संचालक डॉ. मुकेश गोयल, रजिस्ट्रार डॉ. एम. एम. मुजुमदार यांचे मार्गदर्शन लाभले. केआयटीचे कार्यकारी संचालक डॉ. व्ही. व्ही. कार्जिन्नी यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन प्रा. क्षितिजा ताशी यांनी केले. संयोजक डॉ. अक्षय थोरवत, सचिव डॉ. ग्रंतेज ओतारी, प्रा.मुजिर मकानदार, प्रा.भारत इंगवले,प्रा.किरण कांगले,प्रा.सौरभ जोशी,प्रा.रणजित भोसले, डॉ.मनोज यादव,प्रा.ओंकार सूर्यवंशी,प्रा.समर्थ शिरोळ, प्रा.निखिलेश सौन्दत्तीकर, प्रा. पल्लवी ढेकणे, एन. टी. पाटील यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Todays Latest Marathi News Kgo22b01785 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..