फोटो ओळ..१)पाचगाव सीसीटीव्ही कक्षाचे वीज कनेक्शन तोडल्याने कक्षात अंधार,२)शौचालयाची दुरवस्था.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फोटो ओळ..१)पाचगाव सीसीटीव्ही कक्षाचे वीज कनेक्शन तोडल्याने कक्षात अंधार,२)शौचालयाची दुरवस्था..
फोटो ओळ..१)पाचगाव सीसीटीव्ही कक्षाचे वीज कनेक्शन तोडल्याने कक्षात अंधार,२)शौचालयाची दुरवस्था..

फोटो ओळ..१)पाचगाव सीसीटीव्ही कक्षाचे वीज कनेक्शन तोडल्याने कक्षात अंधार,२)शौचालयाची दुरवस्था..

sakal_logo
By

03426, 03427
पाचगाव ः सीसीटीव्ही कक्षाची वीज जोडणी तोडल्याने कक्षात पसरलेला अंधार. दुसऱ्या छायाचित्रात शौचालय परिसरात वाढलेली झुडपे.

सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष अंधारात
पाचगावात थकबाकीमुळे वीज जोडणी तोडली; शौचालयाची पडझड

प्रकाश पाटील ः सकाळ वृत्तसेवा
कंदलगाव, ता. ३० ः ऑगस्ट २०२० मध्ये जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून कळंबा, पाचगाव, मोरेवाडी परिसरांत १४७ सीसीटीव्ही कॅमेरे लावून परिसरात होणाऱ्या चोऱ्यांपासून नागरिकांचे भय कमी केले; मात्र हा प्रकल्प राबविताना पुढे येणाऱ्या अडचणींचे नियोजन न केल्याने पाचगाव नियंत्रण कक्ष समस्येच्या गर्तेत सापडला आहे.
२ ऑगस्ट २०२० ला परिसरातील मुख्य चौक, मुख्य रस्त्यांवर एकूण १४७ कॅमेरे लावण्यात आले. सुरुवातीचा दीड वर्षाचा काळ सोडला तर तिथून पुढे सीसीटीव्ही कॅमेरे नेहमी बंद पडल्याने गुन्हेगारांचा तपास लागत नव्हता आणि आता वीज बिलाची थकबाकी असल्याने बुधवारी (ता. २४) वीज जोडणी तोडल्याने नियंत्रण कक्ष अंधारात आहे.
सध्या कक्षात रात्रीच्या ड्यूटीवर असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याला संपूर्ण रात्र मोबाईल टॉर्चवर काढावी लागते. परिसर अस्वच्छ असल्याने, तसेच शौचालयाची दुरवस्था झाल्याने जीव मुठीत घेऊन रात्र काढावी लागते.

चौकट.
देखभाल, दुरुस्तीचे नियोजन करायचे कोणी?
या प्रकल्पाचे पुढील काळात वीजबिल, देखभाल-दुरुस्तीचे नियोजन झाले नसल्याने प्रत्येक जण एकमेकांकडे बोट दाखवून बाजू झटकत आहेत. त्यामुळे या कक्षाची स्थिती बिकट झाली आहे. कोट्यवधींचा खर्च करूनही देखभाल, दुरुस्ती होत नाही. त्यामुळे हे काम कोणाचे, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

कोट
दोन-तीन वेळा सीसीटीव्हीचे वीजबिल आम्ही भरले आहे. पाचगावमध्ये कक्ष असल्याने प्रत्येक वेळी पाचगाव, मोरेवाडीने बिल भरायचे का? प्रशासनाने वीज बिलाबद्दल योग्य उपाययोजना करावी.
-संग्राम पाटील, सरपंच, पाचगाव.
-रूपाली बाजारी, सरपंच, मोरेवाडी.

कोट
कक्ष सुरू झाल्यापासून एकदाही बिल भरलेले नाही. थकबाकी तीन लाखांवर गेल्याने वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशानुसार वीज जोडणी बंद केली आहे.
-विठ्ठल चौगुले, सहाय्यक अभियंता, आर. के. नगर.

Web Title: Todays Latest Marathi News Kgo22b01800 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..