फोटोओळ.आर.के.नगर पाण्याच्या टाकी परिसरात झालेली अस्वच्छता. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फोटोओळ.आर.के.नगर पाण्याच्या टाकी परिसरात झालेली अस्वच्छता.
फोटोओळ.आर.के.नगर पाण्याच्या टाकी परिसरात झालेली अस्वच्छता.

फोटोओळ.आर.के.नगर पाण्याच्या टाकी परिसरात झालेली अस्वच्छता.

sakal_logo
By

03435
आर. के. नगर ः पाण्याच्या टाकी परिसरात वाढलेले गवत.
-
03434
संरक्षक भिंतीचा उघडा असलेला दरवाजा.
-
03436
टाकी परिसरात पडलेले झाड.
.......................................

पाणीपुरवठा टाक्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
आर. के. नगर परिसरात गवतामुळे अस्वच्छता; झाकण नसल्याने टाकींची दुरवस्था

प्रकाश पाटील ः सकाळ वृत्तसेवा
कंदलगाव, ता. २ ः सुभाषनगर पंपिंगमधून उपसा केलेल्या पाण्याचा पाचगाव, मोरेवाडी परिसरातील ३५ पेक्षा जास्त कॉलनींना व मुळगावांना पुरवठा करण्यासाठी आर. के. नगर टेकडीवरील दोन टाकीत साठा केला जातो. हा साठा झालेल्या पाण्याचा रितसर पुरवठा करण्यात येतो. मात्र, येथील टेकडीवर असणाऱ्या दोन पाण्याच्या टाकींची दुरवस्था झाल्याने परिसरात पडलेली झाडे, मोठे गवत व दलदलीचे साम्राज्य पसरले आहे. याबाबत महापालिका पाणीपुरवठा जल अभियंता हर्षजित घाटगे व उपजल अभियंता रावसाहेब चव्हाण यांच्याशी संपर्क साधला. मात्र, संपर्क झाला नाही.
या ठिकाणी जीवन प्राधिकरण व महापालिकेची प्रत्येकी एक टाकी आहे. यामधून आपआपल्या परिसरात पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र, या दोन्ही विभागाकडून सुरक्षा व स्वच्छतेबाबत कोणतीही उपाययोजना होत नाही.
जीवन प्राधिकरण व महापालिका या दोन विभागाकडून या ठिकाणचा वापर केला जातो. मात्र, स्वच्छतेबाबत एकमेकांकडे बोट दाखविले जाते. मग या परिसराची जबाबदारी घेणार कोण हा प्रश्‍न उपस्थित होत आहे.
सुमारे पाच लाख लिटरसाठा असणाऱ्या दोन टाक्या आहेत. या टाकीत जमा होणारे पाणी टाकीला झाकण नसल्याने उघड्यावर आहे. या ठिकाणी सुरक्षा नसल्याने मद्यपी, नशेखोर तरुणांचा वावर असतो. संरक्षक भिंतीचा दरवाजा २४ तास उघडा असतो.

कोट
अनेक वर्षांपासून फक्त गरजेपूरता परिसराचा वापर होत आहे. जीवन प्राधिकरण व महापालिकेचे दुर्लक्ष आहे. स्वच्छता होत नसल्याने परिसरात गवत उगविले आहे. झाडे पडली आहेत. सुरक्षा खोलीचे दरवाजे, खिडक्या गायब झाल्या आहेत.
- ऋषिकेश हुन्नुरे, अध्यक्ष, राष्ट्रवादी युवक कॉँग्रेस, दक्षिण

कोट
हा परिसर महापालिकेचा असून, स्वच्छतेबाबत त्यांच्याशी पत्रव्यवहार करू.
- अमित पाथरवट, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण

Web Title: Todays Latest Marathi News Kgo22b01803 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..