टुडे ४ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टुडे ४
टुडे ४

टुडे ४

sakal_logo
By

‘केआयटी’तर्फे अभियांत्रिकीतील
संधीबाबत बुधवारी मार्गदर्शन

कंदलगाव, ता. ११ ः कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे स्वायत्त अभियांत्रिकी (केआयटी) महाविद्यालयातर्फे ‘बारावी शास्त्रनंतर अभियांत्रिकीमधील संधी आणि प्रवेशप्रकिया २०२२’ या विषयावरील मार्गदर्शन कार्यक्रमाचे बुधवारी (ता. १४) सायंकाळी ४ वाजता केशवराव भोसले नाट्यगृहात आयोजन केल्याची माहिती संचालक डॉ. मोहन वणरोट्टी व कार्यकारी संचालक डॉ. विलास कार्जिन्नी यांनी दिली. यंदा जाहीर झालेला बारावी परीक्षेचा, तसेच जेईईचा निकाल, तर येऊ घातलेल्या सीईटी परीक्षेचा निकाल या पार्श्वभूमीवर विद्यार्थी व पालक यांच्या मनातील गोंधळ कमी करून त्यांच्या मनातील प्रश्न व शंकांचे निरसन करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यात डॉ. वणरोट्टी, डॉ. कार्जिन्नी, प्रा. अजित पाटील, डॉ. महेश शिंदे यांबरोबरच अन्य तज्ज्ञ मार्गदर्शक माहिती देणार असून या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kgo22b01812 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..