शिक्षक धारेवर; शाळा व्यवस्थापनाने उशिरा आल्याबद्दल विचारला जाब | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षक धारेवर; शाळा व्यवस्थापनाने उशिरा आल्याबद्दल विचारला जाब
कंदलगाव...

शिक्षक धारेवर; शाळा व्यवस्थापनाने उशिरा आल्याबद्दल विचारला जाब

sakal_logo
By

गिरगावात शिक्षक धारेवर; शाळा व्यवस्थापनाने उशिरा आल्याबद्दल विचारला जाब

कंदलगाव, ता. १२ ः गिरगाव (ता. करवीर) येथील शाळेची पटसंख्या १३६ असून शाळेत एकूण सहा शिक्षक आहेत. या शिक्षकांना वारंवार सूचना देऊनही काही शिक्षक शाळेत उशिरा येत होते. आज व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवाजी कोंडेकर व उपाध्यक्ष गजानन कुरणे, तसेच सदस्यांकडे आलेल्या तक्रारीनुसार गावकरी व काही सदस्यांसमवेत त्यांनी शाळेला भेट दिली असता काही शिक्षक उशिरा येऊन १० मिनिटे आधीची वेळ टाकून उपस्थिती नोंदवीत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी संतप्त पालकांसह शाळा व्यवस्थान समितीने संबंधित शिक्षकांना धारेवर धरले.
१२ फेब्रुवारी २०२१ रोजी तत्कालीन विस्तार अधिकारी भारती कोळी यांनी याबाबत सर्व शिक्षकांकडून वेळेत येण्याचे लेखी घेऊनही शिक्षक वारंवार उशिरा येत असल्याने पालकांचा पारा चढला. यावेळी शाळा व्यवस्थापन सदस्या मयुरी चव्हाण, सुरेश पाटील, उत्तम नवाळे,पालक सचिन पाटील, सुरेश कांबळे, संभाजी साळोखे, पोलिस पाटील उमेश लोहार आदी उपस्थित होते.

कोट.
शाळेत शिक्षक उशिरा येत असल्याने वारंवार पालकांची तक्रार होती. त्यानुसार सर्व शिक्षकांना दोन वर्षांपासून सूचना दिल्या असूनही शाळेत शिक्षक उशिरा येतात. याबाबत वरिष्ठांनी दखल घेऊन चौकशी करावी.
- शिवाजी कोंडेकर, अध्यक्ष - गजानन कुरणे, उपाध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती, गिरगाव.

शनिवारी पाऊस असल्याने काही शिक्षकांच्या दुचाकी शाळेतच होत्या. त्यामुळे आज शाळेत येण्यास शिक्षकांना वेळ झाला. शासनाकडून शाळेत १० वाजता घेण्याचा लेखी आदेश नाही.
- रेखा पाटील, प्रभारी मुख्याध्यापक, गिरगाव.

Web Title: Todays Latest Marathi News Kgo22b01818 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..