कंदलगाव ... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कंदलगाव ...
कंदलगाव ...

कंदलगाव ...

sakal_logo
By

ग्रामसेवक गैरहजर असल्याने
मोरेवाडीत विविध कामे रखडली

कंदलगाव, ता. १५ ः शहराशेजारील सुमारे वीस हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असणाऱ्या मोरेवाडी (ता. करवीर) येथील ग्रामसेवक न सांगता दहा दिवसांपासून ग्रामपंचायत कार्यालयात गैरहजर असून, त्यांना फोन केला असता त्यांचा फोन''नॉट रिचेबल''येत आहे. सरपंच व सदस्यांनी वारंवार फोन केले असता त्यांना प्रतिउत्तर दिलेले नाही. गावातील अनेक नागरिकांना ग्रामसेवक नसल्याने शैक्षणिक, घरगुती तसेच इतर दाखल्यासाठी वारंवार हेलपाटे घालावे लागत असल्याचे चित्र आहे.
नागरिकांना विविध कार्यालयीन कामकाजासाठी लागणारे उतारे, विकासकामांचे नियोजन, ग्रामसभेचा अहवाल, ठरावांची अंमलबजावणी, ग्रामसभेचे पत्रव्यवहार, शासकीय योजनांची माहिती यांसह अनेक कामांत ग्रामसेवकांचा महत्त्‍वाचा सहभाग असल्याने विविध कामे दहा दिवसांपासून रेंगाळली आहेत.
ग्रामसेवक आर. सी. पाटील यांच्याशी वारंवार संपर्क करूनही त्यांनी फोन उचलला नाही.

कोट
ग्रामस्थ व सदस्यांनीसंबंधित ग्रामसेवकांच्या गैरहजरीबाबत माहिती दिली आहे. गैरहजर दिवसाबद्दल त्यांना विनावेतन नोटीस पाठविली आहे. तसेच तत्काळ खुलासा करण्याबाबत सूचना दिली आहे.
-जयवंत उगले, गटविकास अधिकारी, पंचायत समिती करवीर

कोट
ग्रामसेवक गैरहजर असल्याबाबत गटविकास अधिकाऱ्यांडे तक्रार केली आहे. वरिष्ठ पातळीवर योग्य तो निर्णय घेऊन गावासाठी ग्रामसेवक द्यावा.
-रुपाली बाजारी, सरपंच, मोरेवाडी

Web Title: Todays Latest Marathi News Kgo22b01824 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..